मुंबई, 28 जानेवारी : पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) सिक्युरिटी मॅनेजर (Security Manager) पोस्टच्या 100 जागांसाठी भरती सुरू केली आहे. बँकेच्या वेबसाईटवर आजपासून अर्ज उपलब्ध झाले असून, 13 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आणि शुल्क भरायचे आहे, तर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी बँकेत जमा करणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
1) बँकेच्या https://www.pnbindia.in/ वेबसाईटला भेट द्या.
2) होमपेजच्या तळाशी जाऊन तिथं असलेल्या रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करा.
3) अॅप्लिकेशन अर्ज आणि कॅश व्हाउचर ओपन करा.
4) दोन्ही फाईल्स डाऊनलोड करा आणि त्यांची प्रिंट काढा.
5) अर्ज आणि कॅश व्हाउचरवर आवश्यक ती सर्व माहिती भरा.
6) अॅप्लिकेशन अर्ज आणि कॅश व्हाउचरची कॉपी खालील पत्त्यावर पाठवा.
चीफ मॅनेजर(रिक्रुटमेंट सेक्शन)एचआरएम डिव्हिजन, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट ऑफीस, प्लॉट नंबर 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली -110075
अॅप्लिकेशन फी : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत 500 रुपये अॅप्लिकेशन शुल्क भरावं लागेल. सर्व महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना हे शुल्क माफ आहे. त्यांना फक्त पोस्टेजचे 50 रुपये भरावे लागणार आहेत.
वयाची अट : एक जानेवारी 2021 पर्यंत उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असता नये. कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असून, अनुसूचित जाती आणि जमातींतील उमेदवारांसाठी वयाची अट 5 वर्षांनी शिथील आहे. ओबीसी वर्गातील उमेदवारांना वयाची अट 3 वर्षासाठी शिथिल आहे. 1984 च्या दंगलीमध्ये मरण पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना वयाची अट 3 वर्षांसाठी शिथिल आहे. जम्मू-काश्मीरमधील ज्या उमेदवारांकडे एक जानेवारी 1980 ते एक जानेवारी 1989 या कालावधीतील डोमिसाईल आहे, त्यांनाही वयात 3 वर्षांची सवलत आहे. निवृत्त सैनिकांसाठीही कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत आहे.