मराठी बातम्या /बातम्या /करिअर /बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत होतेय बंपर पदभरती; तुम्ही आहात का पात्र?

बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत होतेय बंपर पदभरती; तुम्ही आहात का पात्र?

बँक

बँक

पंजाब अँड सिंध बँकेनं चीफ डिजिटल ऑफिसर आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवलेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च:   बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. पंजाब अँड सिंध बँकेनं चीफ डिजिटल ऑफिसर आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवलेत. निवडलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी असेल, असं बँकेनं त्यांच्या अधिकृत सूचनेमध्ये म्हटलं आहे. 'स्टडीकॅफे'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अर्ज कसा कराल?

पंजाब अँड सिंध बँकेतल्या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठीची अंतिम तारीख 31 मार्च आहे. हा अर्ज करताना उमेदवारांना 1150 रुपयांची अर्ज फी भरावी लागेल.

तब्बल 3,86,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; चान्स सोडूच नका; इथे होतेय बंपर पदभरती

पात्रता

चीफ डिजिटल ऑफिसर या पदासाठी उमेदवाराकडे कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेश या विषयातल्या इंजिनीअरिंगची पदवी असावी किंवा भारतातल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमसीए केलेलं असावं. चीफ मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही क्षेत्रातली पदवी असावी व मार्केटिंग विषयातला 2 वर्षांचा एमबीए कोर्स केलेला असावा किंवा मार्केटिंग विषय घेऊन दोन वर्षांचा PGDBA (Post Graduate Diploma in Business Administration), PGDBM (Post Graduate Diploma in Business Management) कोर्स केलेला असावा.

अनुभव

चीफ डिजिटल ऑफिसर

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डिजिटल लीडरशिपमध्ये किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. तसंच BFSI (Banking Financial Services and Insurance) क्षेत्रामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर किंवा डेप्युटी जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर व त्यासारख्या पदावरचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

चीफ मार्केटिंग ऑफिसर

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीएफएसआय (BFSI) क्षेत्रातल्या मार्केटिंगचा किमान 10 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा व कार्यकाळ

पंजाब अँड सिंध बँकेतल्या या पदांसाठी किमान 35 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे अर्ज करू शकतात. अर्थात या जागांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षं इतकी आहे. बँकेकडून या उमेदवारांना 3 वर्षांसाठी नियुक्त केलं जाईल; मात्र ही नियुक्ती आणखी 2 वर्षं वाढवली जाऊ शकते असंही बँकेनं म्हटलंय.

क्या बात है! आता परदेशात जॉबसाठी वाट बघण्याची गरजच नाही; 'या' देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर Visa

पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज पाठवण्यासाठीची अंतिम तारीख 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1180 रुपये फी भरावी लागेल. त्यानंतर मुलाखतींद्वारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. या पदांसाठीच्या मानधनाबाबत उमेदवारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं बँकेनं म्हटलं आहे.

पंजाब अँड सिंध बँकेमध्ये या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीनं केल्या जाणार आहेत; मात्र त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून आणखी 2 वर्षांनी तो वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams