मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC 2019 Result: याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

UPSC 2019 Result: याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

2015पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली,4 ऑगस्ट : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेनं.

महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने 2018मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143वा क्रमांक मिळवला.

वाचा-UPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी

जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र IESमध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

2015पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

वाचा-PHOTOS : दोन भावांच्या मदतीनं बहिणी झाली IAS, UPSC परीक्षेत देशात चौथी

UPSC Civil Services exam Result 2019 : असा पाहा निकाल

स्टेप 1 - UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

स्टेप 2- Final Result: Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 - या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा

स्टेप 4 - पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

First published:

Tags: Upsc, Upsc exam