Pune University : OEE मेरिट लिस्ट लागली, मास्टर्स प्रोग्रॅमसाठीची प्रवेशयादी जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MSc, MA अशा मास्टर्स प्रोग्रॅमची प्रवेश यादी जाहीर झाली आहे. unipune.ac.in या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिकृत यादी पाहता येईल.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 08:19 PM IST

Pune University : OEE मेरिट लिस्ट लागली, मास्टर्स प्रोग्रॅमसाठीची प्रवेशयादी जाहीर

पुणे, 18 जुलै : पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा म्हणजेच OEE चा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. Unipune.nic.in या वेबसाईटवर Pune University OEE Merit List या सेक्शनमध्ये ही गुणवत्ता यादी विषयानुसार देण्यात आली आहे. Online Entrance Examination Admission Merit list असा सर्च दिल्यानंतर विषयानुसार ही यादी पाहता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Savitribai Phule Pune University पर्यावरणशास्त्र आणि विज्ञान विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ही मेरिट लिस्ट आहे. MSc Atmospheric Science आणि MSc Environmental Science या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश यादी जाहीर झाली आहे. या यादीबरोबरच अॅडमिशनपूर्वीचं कौन्सेलिंग सेशनची वेळही नोंदवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया, कौन्सेलिंग याचं सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलं आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात घेतले जाणारे BA संगीत, नृत्य आणि नाट्य या अभ्यासक्रमाची प्रवेशयादीसुद्धा जाहीर झाली आहे. वेटिंग लिस्टही विद्यार्थ्यांना पाहता येईल.

OEE Admission merit list 2019 थेट पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे थेट प्रवेश यादी पाहता येईल.

Environmental Science : प्रवेशयादीसाठी इथे क्लिक करा

MSc Chemistry : प्रवेशयादीसाठी इथे क्लिक करा

Loading...

BA Dance : इथे क्लिक करा

---------------------------------

वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...