• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Pune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

Pune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

Pune Metro Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, पुणे मेट्रोमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.

 • Share this:
  पुणे, 16 एप्रिल: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation LTD) अंतर्गत येणाऱ्या पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कार्यासाठी रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया होत आहे. यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या भरती प्रक्रियेसाठी पुणे मेट्रोकडून इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यामध्ये उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, अकाऊंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे. पदाचे नाव - उपमहाव्यवस्थापक (Dy. General Manager - Finance E3 रिक्त पदांची संख्या - 2 वयोमर्यादा - कमाल 45 वर्षे पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer - Signal and Telecom S1) रिक्त पदांची संख्या - 2 वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer - Mechanical S1) रिक्त पदांची संख्या - 2 वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे पदाचे नाव - अकाऊंट असिस्टंट (Account Assistance - Fin - NS4) रिक्त पदांची संख्या - 5 वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे अर्ज कसा करावा  ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक कागपत्र जोडून आपला अर्ज सादर करु शकतात. अपात्र आणि अपूर्ण अर्ज भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. वाचा: GOOD NEWS! तुमची Salary 10% टक्के वाढणार; Lockdown मध्ये कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी महामेट्रोच्या www.mahametro.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रकियेसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. संपूर्ण जाहिरात आणि अर्जाचा नमूना www.mahametro.org येथे पहायला मिळेल. निवड प्रक्रिया अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळवण्यात येईल. यानंतर या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. उमेदवाराला मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ देण्यात येईल आणि त्यावेळी सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह उमेदवाराने मुलाखतीच्या ठिकाणी हजर रहावे.
  Published by:Sunil Desale
  First published: