Home /News /career /

अभिमानास्पद! वडिलांचं अचानक झालं निधन, पण खचून न जाता पुण्याच्या पोरानं घेतली लेफ्टनंट पदापर्यंत झेप

अभिमानास्पद! वडिलांचं अचानक झालं निधन, पण खचून न जाता पुण्याच्या पोरानं घेतली लेफ्टनंट पदापर्यंत झेप

'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी' (NDA) मध्ये दाखल होण्यापूर्वी अनिकेतचे वडिल अमरेंद्र साठे यांचं अचानक निधन झालं. या धक्क्यानं खचून न जाता अनिकेतनं (Aniket Sathe) लष्करातील लेफ्टनंट (Lieutenant) पदाला गवसणी घातली आहे.

    पुणे, 22 डिसेंबर: वर्षभरापूर्वी पुण्याचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्याच्या लष्कर प्रमुखपदी निवड झाली. ही बाब अखंड महाराष्ट्रासाठी आणि पुणेकरांसाठी खूपच अभिमानास्पद होती. या घटनेच्या बरोबर एक वर्षानंतर आणखी एक पुणेकरांसाठी आणखी एक अभिमानास्पद घटना घडली आहे. पुण्यातील तरुण अनिकेत अमरेंद्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे 12 डिसेंबरला पार पडलेल्या दीक्षांत संचलनानंतर त्यांची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी'मध्ये दाखल होण्यापूर्वी अनिकेत यांचे वडील अमरेंद्र साठे यांचं अचानक निधन झालं. हा धक्का अनिकेत आणि कुटुंबीयांसाठी खूपच मोठा होता. पण अनिकेत खचला नाही. त्यानं त्याच्या आयुष्यात आलेल्या या परिस्थितीवर मात करीत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या उत्तुंग यशानं एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे पूर्ण केलं. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर 2016 मध्ये अनिकेत साठे यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA) च्या 137 व्या तुकडीसाठी निवड झाली होती. 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी'त तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून मध्ये एक वर्षाचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. चार वर्ष खडतर मेहनत केल्यानंतर आज त्याची लेफ्टनंट पदी निवड झाली. आज जरी त्यांच्या यशाचा डंका सगळीकडे वाजत असला तरी त्यामागं त्यांची चार वर्षांची अखंड तपश्चर्या आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाचं पुण्यातील विविध स्तरातून होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या