Home /News /career /

तुम्हीही Distance Education घेण्याचा विचार करताय? जरा थांबा; आधी वाचा फायदे आणि नुकसान

तुम्हीही Distance Education घेण्याचा विचार करताय? जरा थांबा; आधी वाचा फायदे आणि नुकसान

Distance Education चे काही फायदे आणि नुकसान

Distance Education चे काही फायदे आणि नुकसान

आज आम्ही तुम्हाला Distance Education चे काही फायदे आणि नुकसान (Pros and Corns of Distance Education) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

    मुंबई, 23 फेब्रुवारी: आजकालच्या काळात सर्वजण करिअर (Career Tips in Marathi) करण्यासाठी धडपडत आहेत. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात लवकरात लवकर करिअर (Career Tips) करायचं आहे. मात्र दुसरीकडे त्यांना काही नं काही शिक्षण घेत राहण्याची इच्छा आहे. म्हणूनच यासाठी अनेकजण Distance Education चा पर्याय (How to take Distance Education) निवडतात. Distance Education म्हणजेच पार्ट टाइम शिक्षण (Part time education) घेणे. जर तुम्हीही Distance Education घेण्याचा विचार कात असाल तर हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे आज आम्ही तुम्हाला Distance Education चे काही फायदे आणि नुकसान (Pros and Corns of Distance Education) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. हे आहेत काही फायदे -  सोयीनुसार शिक्षण Distance Education मध्ये, विद्यार्थी संगणक आणि इंटरनेटद्वारे कोणत्याही ठिकाणाहून आपला इच्छित अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. Distance Education साठी नावनोंदणी करणार्‍यांपैकी एक मोठा भाग पगारदार लोकसंख्येचा आहे. या शिक्षण पद्धतीअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना नोकरी किंवा व्यवसायात तडजोड न करता आरामात अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो. याशिवाय अभ्यासाचे साहित्यही ऑनलाइन उपलब्ध असते. म्हणूनच Distance Education मुले फायदा होऊ शकतो. आयकर विभागात नोकरीचं आमिष दाखवत होतेय फसवणूक; अशी घ्या काळजी, IT ने केलं Alert घरबसल्या शिक्षणाची संधी Distance Education दूरस्थ शिक्षण हे ऑनलाइन आधारित आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या आरामात अभ्यास करता येतो आणि असाइनमेंट पूर्ण करता येतात. Distance Education प्रोग्राम ऑफर करणार्‍या बहुतेक संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य किंवा ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लेक्चर्स आणि शिकवण्या देतात. त्यामुळे उमेदवारांना घरबसल्या शिक्षण घेता येतं. हे होऊ शकतं नुकसान - कमी सामाजिक संपर्क संस्थेत शिकणे विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देते. डिस्टन्स एज्युकेशन विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन आधारित क्लासेस आणि शिक्षण सामग्रीपुरते मर्यादित करते. यामुळे विद्यार्थ्यांना कोणाशी संवाद साधता येत नाही किंवा प्रत्यक्ष बोलता येत नाही. Golden Chance! पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्णांसाठी Jobs; इतका मिळणार पगार शिक्षणाची विश्वासार्हता नाही इतर अनेक आव्हाने जसे की दूरस्थ शिक्षणामध्ये योग्य मूल्यांकनाचा अभाव पदवीची विश्वासार्हता शंकास्पद बनवते. एकीकडे ऑनलाइन प्रोग्रामची संख्या वाढत असताना दुसरीकडे घोटाळे करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ज्यामुळे अनेक लोकांमध्ये दूरस्थ शिक्षणाच्या पदव्यांची विश्वासार्हता संशयास्पद आहे.म्हणून तुम्ही घेतलेले शिक्षण हे विश्वासार्ह आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Online education

    पुढील बातम्या