मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सावधान! तुमच्या एका चुकीमुळे थांबू शकतं Promotion: ऑफिसमध्ये असं वागणं करा Avoid

सावधान! तुमच्या एका चुकीमुळे थांबू शकतं Promotion: ऑफिसमध्ये असं वागणं करा Avoid

 या चुकांमधून बोध घेऊन काम करत राहा प्रमोशन (Promotion Tips) तुम्हालाच मिळेल.

या चुकांमधून बोध घेऊन काम करत राहा प्रमोशन (Promotion Tips) तुम्हालाच मिळेल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका (Avoid to these mistakes to get promotion) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं प्रमोशन थांबवलं जाऊ शकतं.

    मुंबई, 05 डिसेंबर: तुमचं एक चांगलं पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर (How to be successful) नेऊन ठेऊ शकतं तर एक चुकीचं पाऊल खालीही आणू शकतं. ऑफिसमधील प्रमोशनचं (Promotion in Office) अगदी असंच आहे. तुम्ही सातत्यानं चांगलं काम करत राहाल चुका होऊ देणार नाही तर तुम्हाला नक्की प्रमोशन (How to get promotion easily in Office) मिळेल. मात्र तुमची एक चूक तुम्हाला प्रमोशन मिळण्यापासून थांबवू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका (Avoid to these mistakes to get promotion) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं प्रमोशन थांबवलं जाऊ शकतं. त्यामुळे या चुकांमधून बोध घेऊन काम करत राहा प्रमोशन (Promotion Tips) तुम्हालाच मिळेल. अनेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापक त्यांच्या आवडत्या कर्मचाऱ्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात, परंतु बाकीच्यांकडे दुर्लक्ष करतात.मात्र हे फार क्वचितच घडते. बहुतेक कंपन्यांमध्ये ही प्रक्रिया अगदी न्याय्य आहे. तुमच्या या चुकांमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. नवीन Skills न शिकणे कंपनीत पुढे जाण्यासाठी नवीन स्किल्स शिकणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे स्किल्स विकसित करत राहिल्यास तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळेल. तुम्ही ज्या नवीन गोष्टी शिकत आहात त्यांचा उपयोग कंपनीच्या फायद्यासाठी नक्की करा. यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकेल. कामाचा कंटाळा करणे ओव्हरटाईम करणे किंवा इतरांचं काम करण्यास भाग असणे ही बाब वेगळी मात्र कामाचा कंटाळा करू नका. परंतु आवश्यकतेनुसार अतिरिक्त काम करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. यामुळे तुमच्यावर असलेला बॉसचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रमोशन मिळू शकेल. महिलांनो, प्रेग्नन्सीनंतर Career ची नवी सुरुवात करायची आहे? या टिप्स नक्की वाचा चुकांमधून बोध न घेणे जर एखादा कर्मचारी सतत त्याच चुका करत असेल आणि त्यातून बोध घेत नसेल, तर करिअरच्या वाढीत खूप फरक पडतो. पुढे जात राहण्यासाठी आपल्या चुका मान्य करून त्या सुधारणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी जुळवून न घेणे ऑफिसमध्ये काम कारण्यासाटःई आपल्या बॉससह सहकाऱ्यांशी जुळवून घेणंही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वागत नसाल किंवा सतत वाद होत असतील तर याचा परिणाम तुमच्या प्रमोशन वर होऊ शकतो. त्यामुळे सर्वांशी जुळवून घेणं आवश्यक आहे. टार्गेट पूर्ण न करणे मार्केटिंग किंवा सेल्समध्ये काम करत असताना बरेच कर्मचारी कामात दिरंगाई करतात आणि त्यांचे टार्गेट पूर्ण होऊ शकत नाहीत. याच गोष्टीमुळे अशा कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुमचे टार्गेट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो अतिआत्मविश्वास असणे कधीकधी अतिआत्मविश्वास असण्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. इतरांपेक्षा मी कसा श्रेष्ठ हे तुम्ही सतत सांगत असाल किंवा स्वतःची स्तुती करत असाल तर ही बाब पटकन लक्षात येते. या तुमच्या स्वभावामुळे तुमचे प्रमोशन थांबू शकते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या