SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... स्कॉलरशिप नियमांत झाले मोठे बदल

SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज... स्कॉलरशिप नियमांत झाले मोठे बदल

अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांच्या (ST ST)शिष्यवृत्तीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : अनुसूचित जातीच्या (scheduled caste) विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय शिष्यवृत्तीच्या नियमात (central scholarship rules) शासनानं आता मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी ठरणारे हे बदल आहेत.

यात येत्या पाच वर्षांत केंद्र शासन अनुसूचित जातीच्या चार कोटीहून जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. यावर साठ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाचे फायदे नीटपणे मिळावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळानं बुधवारी नियमांमध्ये मोठे बदल केले.

विशेष गोष्ट ही आहे, की आता शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकली जाईल. खरंतर या योजनेत 60 टक्के हिस्सा केंद्र शासन आणि 40 टक्के हिस्सा राज्य शासन देणार आहे. अंदाज वर्तवला जातो आहे, की यात किमान 60 कोटी रुपये खर्च होतील ज्यातील 35 हजार 500 करोड रुपये केंद्र आणि बाकीची रक्कम विविध राज्य शासन उपलब्ध करतील.

सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे

केंद्रीय मंत्री थावर चंद गहलोत यांच्या मते आता या योजनेद्वारे पैसे सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यात पाठवले जातील. खरंतर पूर्वी केंद्र राज्याला पैसे देत होतं. यातून विद्यार्थ्यांपर्यंत पैसा पोचायला खूप वेळ लागायचा. सरकारचा असाही दावा आहे, की या योजनेमुळे अनुसूचित जातीच्या 1 कोटी 36 लाख विद्यार्थ्यांना येत्या 5 वर्षात पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जाईल. हे विद्यार्थी गरिबी आणि इतर कारणांमुळं शिक्षणापासून वंचित राहिलेले असे असतील.

डीटीएच सेवांचेही नियम बदलले

शासनाने याव्यतिरिक्त डीटीएच सेवांच्या नियमांमध्येही बदल केला आहे. यात शंभर टक्के एफडीआयला मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या काही नियमांमुळे आजवर असं होणं शक्य नव्हतं. आता हे नियम हटवले गेलेत.

Published by: News18 Desk
First published: December 23, 2020, 10:44 PM IST

ताज्या बातम्या