मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10 वी, 12 वीनंतर MPSC, UPSC परीक्षांची तयारी करावी का?

10 वी, 12 वीनंतर MPSC, UPSC परीक्षांची तयारी करावी का?

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स

10 वी, 12 वीनंतर एमपीएससी, युपीएससी (MPSC, UPSC) परीक्षांची तयारी करावी का? असा प्रश्न अनेकजण विचारत असतात. सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता पाहता हा निर्णय घेताना सारासार विचार करणे आवश्यक झाले आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 21 डिसेंबर : प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात 10 वी, 12 वी हा महत्वाचा टप्पा समजला जातो. कारण, यानंतर त्यांच्या करिअरला दिशा मिळणार असते. सध्याच्या काळात अनेक नवनवीन क्षेत्र उपलब्ध झाली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. अनेकजण दहावी बारावीनंतर स्पर्धा परीक्षेकडे (MPSC, UPSC) वळण्याचा विचार करतात. त्यासाठी कोणत्या शाखेला प्रवेश घेणे योग्य राहील? स्पर्धा परीक्षेसाठी आत्तापासून कशी तयारी करायला हवी? असे अनेक प्रश्न पालक, विद्यार्थी विचारत असतात.

या विद्यार्थ्यांना तेवढी समज असते का?

10 वी 12 वी च्या फार कमी मुलांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याइतके ज्ञान किंवा अनुभव असतो. त्यामुळे यावेळचे निर्णय बऱ्याचदा पालकांनी घेतलेले किंवा ऐकीव माहितीवरुन घेतले जातात. त्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वेगळी आवड निर्माण होऊ शकते. अशावेळी अपुऱ्या माहितीवर अगोदर घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. अशावेळी जर क्षेत्र बदलायचं ठरलं तर यासाठी दिलेला वेळ, पैसा या गोष्टींमुळे निर्णय घेणे अवघड जाऊ शकते. विद्यार्थ्यांना मुळात या क्षेत्राची आवड हवी. या क्षेत्रातील ग्लॅमर पाहून अनेकजण इकडे वळल्याचं पहायला मिळतं. पुढे अभ्यास झेपत नसल्याने मग निराशा येऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तींची तुम्ही मदत घेऊ शकता.

अभ्यास कधी सुरू करावा?

10 वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभ्यास कधी सुरू करावा असा प्रश्न अनेकजण विचारतात. लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा खूप डायनॅमिक असतात. दर 2-4 वर्षात या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये बदल होत असतात. तसेच चालू घडामोडी हा स्पर्धापरिक्षांचा गाभा असतो. त्यामुळे जेव्हा परीक्षा देणार तेव्हाचा अभ्यास जास्त महत्वाचा असतो. 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि पदवीच्या शेवटच्या वर्षी असल्याशिवाय स्पर्धा परीक्षा देता येत नाही. त्यामुळे थेट सगळाच अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाची सवय लावून घेऊ शकता. यासाठी चांगला मार्ग म्हणजे 10 वी, 12 वी नंतरही अनेक सरकारी जागांसाठी परीक्षा असतात. त्या तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला परीक्षा देण्याचा सराव आणि अभ्यासात कुठे भर द्यायला हवा याची जाणीव होईल.

पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! सांगतायेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या IAS

प्लॅन बी आवश्यक

सध्या स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र अतिशय अनिश्चित स्वरूपाचं झालं आहे. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांना आजकाल मृगजळही म्हटलं जातं. यामध्ये अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टींनी फरक पडतो. त्यामुळे 100% यश मिळलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे येताना प्लॅन बी आवश्यक आहे. जर तीन चार वर्षे देऊनही यश मिळाले नाही तर यातून बाहेर पडून देखील चांगले करिअर करता येईल अशी आपली शैक्षणिक पार्श्वभूमी असायला हवी. 10वी, 12वी पासूनच या क्षेत्राकडे जास्त लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांचे पदवीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं प्राधान्य हे पदवीला असू द्या. अर्थात हा निर्णय पुन्हा तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतो. एखादा हुशार विद्यार्थी काही दिवसात पदवीचा अभ्यास पूर्ण करू शकतो.

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

स्पर्धा परीक्षेसाठी कोणती शाखा चांगली

स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तर कोणती पदवी करावी, असे अनेकजण विचारत असतात. पूर्वी कृषी शाखेतील विद्यार्थ्यांचा MPSC मध्ये यश मिळवण्याचा टक्का जास्त होता. तर कला शाखेचे जास्त विद्यार्थी UPSC मध्ये पास व्हायचे. पण आता अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल झाला आहे. कोणत्या एका पदवीला विशेष अशा फायदा मिळत नाही. आता बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेकडे वळत असल्याने स्पर्धा परीक्षेत हे विद्यार्थी जास्त दिसतात.

First published:

Tags: Exam, Mpsc examination, Upsc exam