मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'अभिनंदन! तुम्हाला मोठ्या पॅकेजचा जॉब मिळालाय'; असा मेल तुम्हालाही आलाय? मग सावधान....

'अभिनंदन! तुम्हाला मोठ्या पॅकेजचा जॉब मिळालाय'; असा मेल तुम्हालाही आलाय? मग सावधान....

जॉब शोधताना काळजी

जॉब शोधताना काळजी

आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 ऑक्टोबर: टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध असतात. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड  आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात. तसंच तुमच्या अकाउंटमधून पैसे चोरी करू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी  घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.

खासगी माहिती देऊ नका

ऑनलाईन जॉब शोधताना (Online Job search) तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर जर ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स (Contact details), खाते क्रमांक (Account number), क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका. लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत, कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही बघितलेला जॉब खरंच आहे का याची खात्री करून घ्या.

नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाताय? जरा थांबा; तुमची फसवणूक तर होत नाहीये ना?

वेब पेज सिक्युरिटी तपासा

तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटचं वेब पेज सिक्युअर (Web Page Security) आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखण खूप सोपं आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असं असेल. अशा प्रकारे काळजी घेतल्यानं आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही.

प्रायव्हसी पॉलिसीकडे लक्ष द्या

सुप्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या यूजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) ठेवतात. यात नाव, ईमेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बर्‍याच वेबसाईट्स सोशल सिक्युरिटी (Social Security) देखील देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो. अशा साइट विश्वसनीय असतात.

आयटी क्षेत्रातील हे जबरदस्त कोर्सेस कराच; महिन्याला मिळेल लाखोंमध्ये सॅलरी

नुकसान झाल्यास रिपोर्ट करा

कोणत्याही कारणास्तव जर साईटवरून आपली खासगी माहिती चोरीला गेली किंवा पैसे चोरीला गेले तर गप्प बसू नका. Internet fraud complaint center वर ऑनलाइन तक्रार दाखल करा. जर जास्त नुकसान झालं असेल तर पोलिसांच्या सायबर सेल (Cyber cell) मध्येही तक्रार नोंदविली जाऊ शकते.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Money fraud, Online fraud