मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; IAS अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलं यशाचं खास तंत्र

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; IAS अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलं यशाचं खास तंत्र

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

UPSC Success Story : प्रदीप यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करत होते. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचा निर्धारच केला होता.

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : 2019च्या नागरी सेवा परीक्षेत (IAS) देशात 26वा क्रमांक मिळवणाऱ्या प्रदीप सिंह (Pradeep Singh) यांची कहाणी कोणालाही प्रेरित करेल अशी आहे. मूळचे बिहारचे (Bihar) असलेले प्रदीप सिंह अगदी सर्वसामान्य कुटुंबातले आहेत; मात्र त्यांनी मेहनतीने केलेल्या अभ्यासामुळे त्यांना खूप उच्च पदावर नेऊन पोहोचवलं आहे.

2018मध्ये प्रदीप आयआरएसमध्ये (IRS) देशात 93वे आले होते. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी हे देदीप्यमान यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे ते सर्वांत कमी वयाचे आयआरएस अधिकारी बनले होते; मात्र त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. ते त्यांनी पूर्ण करून दाखवलंच. चौथ्या प्रयत्नात ते आयएएस झाले. बिहार केडरचे आयएएस अधिकारी बनलेल्या प्रदीप सिंह यांनी स्वतःच्या अपयशातून शिकलेल्या काही गोष्टी सांगितल्या.

प्रदीप यांनी दिलेल्या टिप्स:

- यूपीएससी परीक्षेची तयारी ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यात हिंमत हरू नये.

- स्वतःशीच स्पर्धा करा आणि चाचण्या द्या.

- उद्दिष्ट केवळ ठरवू नका, ते प्राप्तही करा.

- तिन्ही टप्प्यांची तयारी एकत्रितपणे करा, वेगवेगळी नको.

- प्रत्येक दिवशी काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा.

- संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करा. त्यातला कोणताही मुद्दा कच्चा राहू देऊ नका.

- दर दिवशी उजळणी करा.

- आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका नक्की पाहा.

- आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. व्यायाम, योगासनं, ध्यान आदी करत राहा.

प्रदीप यांनी सांगितलं, की त्यांना पहिल्या प्रयत्नात यूपीएससीची 93वी रँक मिळाली. रँक अलॉटमेंट होईपर्यंत त्यांनी पुढच्या प्रयत्नाची तयारी सुरू ठेवली. त्याचा फायदा असा झाला, की ते दुसऱ्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा सहजपणे उत्तीर्ण होऊ शकले आणि मुख्य परीक्षेची (UPSC Mains) तयारी करू शकले.

'सुधारणेला कायम वाव'

प्रदीप यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितलं, की पहिल्या प्रयत्नात त्यांना तसा चांगला क्रमांक मिळाला होता. सगळ्याच विषयात चांगले गुण मिळाले होते. मग नेमकी सुधारणा कुठे करायची यावर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. शेवटी त्यांनी सर्वच विषयांत आणखी थोडी तयारी करायचं ठरवलं. त्यांनी जनरल स्टडी (General Studies) आणि तिन्ही पर्यायी विषयांवर लक्ष केंद्रित केलं. पहिल्या वर्षीच्या चुका लक्षात घेतल्या. त्या लक्षात घेण्यासाठी सीनियर्सची मदत घेतली. इंटरव्ह्यूसाठीही विशेष लक्ष दिलं. सुधारणेला कायम वाव असतोच, असं त्यांचं म्हणणं आहे.

(हे वाचा -  आता पाठ्यपुस्तकं विकत घेण्याची गरज नाही, शिक्षणमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा)

वडिलांनी घर विकलं, आईने दागिने

अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रदीप सिंह यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करत होते. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रदीप यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा निर्धारच केला होता. त्यासाठी प्रदीप यांच्या वडिलांनी घर विकलं आणि प्रदीप यांना परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवलं. दरम्यान, त्यांच्या आईला दागिनेही विकावे लागले. या गोष्टींचा प्रदीप यांच्यावर कायम ताण होता, मात्र तो सकारात्मक होता. या सगळ्या अडचणींतून त्यांना यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळे. त्यातूनच त्यांनी यश संपादन करून दाखवलं.

First published:

Tags: Government employees, Inspiring story, Success story, Upsc