मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन

Government job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन

भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.

भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.

भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली संधी आहे. Post Office Jobs 2020 इंडिया पोस्ट (India Post) अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती आहे. 10वी आणि 12वी पासही उमेदवारही या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात. भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी पोस्टमन/मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. किती असेल मासिक पगार - पोस्टमन/मेल गार्डसाठी पगार 21700 ते 69100 रुपयांपर्यंत (पे लेवल 3 नुसार) असेल. तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी पे-स्केल 18000 रुपये ते 56900 रुपयांदरम्यान (पे-स्केल 1 नुसार) असेल. वयोमर्यादा - अधिकृत नोटिफिकेशननुसार, पोस्टमन/मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 25 असणं गरजेचं आहे. (वाचा - नोकरीची सुवर्णसंधी! Supreme Courtमध्ये या पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी डिटेल्स) पात्रता - पोस्टमन/मेल गार्डसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून 12वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदाराने किमान दहावीपर्यंत मराठी भाषा शिकलेली आणि उत्तीर्ण केलेली असावा. तर गोवा राज्यात अर्जदार किमान 10वी पर्यंत कोंकणी किंवा मराठी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. त्याशिवाय कंप्यूटरवरही काम येणं गरजेचं आहे. अर्जदाराची कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट केली जाईल. (वाचा - IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी) मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून 10वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदार किमान 10वीपर्यंत मराठी भाषा शिकलेला आणि त्यात पास झालेला असावा. तर गोव्यात निवडीसाठी अर्जदार कमीत-कमी 10 पर्यंत मराठी किंवा कोंकणी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. मल्टी टास्किंग स्टाफसाठीही कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट घेण्यात येईल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Post office

    पुढील बातम्या