मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'रोजंदारीवर मजूर म्हणूनही काम करायला तयार आहे, पण नोकरी द्या'; पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्याने Twitter वर मांडलं जळजळीत वास्तव

'रोजंदारीवर मजूर म्हणूनही काम करायला तयार आहे, पण नोकरी द्या'; पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्याने Twitter वर मांडलं जळजळीत वास्तव

पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याने बेरोजगारीचं जळजळीत वास्तव ट्विटरवरून अधोरेखित केलं गेलं.  रोजंदारीवर काम करायला तयार आहे, असं त्याचं Tweet चर्चेचा विषय ठरतंय.

पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याने बेरोजगारीचं जळजळीत वास्तव ट्विटरवरून अधोरेखित केलं गेलं. रोजंदारीवर काम करायला तयार आहे, असं त्याचं Tweet चर्चेचा विषय ठरतंय.

पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याने बेरोजगारीचं जळजळीत वास्तव ट्विटरवरून अधोरेखित केलं गेलं. रोजंदारीवर काम करायला तयार आहे, असं त्याचं Tweet चर्चेचा विषय ठरतंय.

नवी दिल्ली, 31 मे: कोरोनामुळे लॉकडाउन (Coronavirus Lockdown) लागू करण्यात आलं आणि उद्योगधंदे बंद पडलेत. त्याआधीपासूचन अर्थव्यवस्था डळमळीत झालेली होती आणि बेरोजगारी वाढणार अशी चिन्हं होतीच, त्यात या कोरोनाच्या संटकाने कहर केला. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यात. त्यामुळे लोकांना काम मिळत नाही, नोकरी नाही, खायचं काय अशा या कठीण काळात अनेकांवर वाईट वेळ आलीय. एका पोस्ट ग्रॅज्युएट अर्थात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याने नुकत्याच केलेल्या ट्विटवरून हे जळजळीत वास्तव अधोरेखित केलं गेलं. जगण्यासाठी अगदी रोजंदारी मजूर म्हणूनही काम करण्यास तो तयार आहे; मात्र बराच शोध घेऊन तेही काम त्याला मिळालेलं नाही. म्हणून त्याने ट्विट करून नोकरी मागितली आहे. विकास सांची असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो दिल्लीच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीचा  विद्यार्थी आहे. 30 मे रोजी विकासने ट्विट केलं आहे. त्यात लिहिलंय की, ‘प्लीज, मला काम मिळवून देण्यात मदत करा. लॉकडाउनमुळे जगणं कठीण झालंय. मजूर म्हणूनही काम मिळत नाहीये. मी रोजंदारीवर काम करायला तयार आहे. तसंच, मी ड्रायव्हर  म्हणूनदेखील काम करू शकतो.’ त्याने ट्विटसोबत त्याचा Resume जोडला आहे. त्यातं लिहिलंय, की, ‘मी दिल्लीच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीतून समाजशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. मी ड्रायव्हर म्हणून काम करू शकतो. कामाबद्दल कोणीही माहिती दिल्यास खूप मोठी मदत ठरेल.’ विकासने समाजशास्त्र विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा 91.48 टक्क्यांसह क्लिअर केली आहे.  सध्या तो कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीतून इंग्रजी साहित्यात एमए करतो आहे. आंबेडकर युनिव्हर्सिटीत शिकत असताना त्याने ‘स्पोर्ट्स डे’निमित्त आयोजित 1500 मीटर शर्यतीत स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं.  तसंच एमए विभागाचा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड झाली होती, असंही त्याने रेझ्युमेमध्ये म्हटलं आहे. रेझ्युमेतील माहितीनुसार, 2013मध्ये त्याने जमालपूरच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर हरियाणातल्या हिस्सार इथल्या गुरू जांभेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी  येथून त्याने मास कम्युनिकेशन विषयात पदवी घेतली. 2018 ते 20 या काळात त्याने दिल्लीच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीतून समाजशास्त्रात एमए पूर्ण केलं. 15 जूनपर्यंत कसा असेल लॉकडाऊन? तुमच्या मनातील प्रश्न आणि शासनाने दिलेली उत्तरं रेझ्युमेत लिहिलंय, की गेल्या वर्षी विद्यापीठ आणि आंबेडकर किंग स्टडी सर्कल कॅलिफोर्निया यूएसए यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यशाळांमध्ये त्याने भाग घेतला होता. त्यापैकी एक "चला, आंबेडकर वाचूया" हे व्याख्यान होतं. प्रयत्नांती परमेश्वर !Amul कंपनीच्या ड्रायव्हरचा मुलगा बनला डेअरी कंपनीत अधिकारी अशोका विद्यापीठात  इंटर्न म्हणून त्याने “पीक अवशेष कचरा जाळणं आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम” या प्रकल्पात काम केलं. त्या वेळी त्याने पर्यावरण आणि शेती परिवर्तनाचं वास्तव समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचं सर्वेक्षण केलं होतं. विकास सांची 2020मध्ये इंटरनॅशनल विंटर स्कूलद्वारे ‘जागतिकीकरण आणि धार्मिक विविधता : समस्या, परिप्रेक्ष्य आणि गांधीवादाचा संदर्भ’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत व्हॉलंटिअर म्हणून सहभागी झाला होता. भावंडांनी 11 वर्षांपूर्वी सुरू केली होती Zerodha Company,वर्षाला कमवतात 200 कोटी विकास म्हणतो, त्याला संशोधन करायला आवडतं. तसंच संशोधन कार्यपद्धतीवरील राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये  भाग घेत असल्यामुळे त्याला कम्प्युटर वापरता येत असल्याचंही त्यानं त्याच्या रेझ्युमेत नमूद केलंय. दरम्यान, विकासचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणारे फोन येत आहेत. लवकरच त्याला नोकरी मिळेल अशी आशा आहे.
First published:

Tags: Corona, Job, Twitter

पुढील बातम्या