Home /News /career /

चहावाल्याच्या लेकींनी घातली पोलिसांची वर्दी; दीक्षांत समारंभात बापाला आभाळ झालं ठेंगणं

चहावाल्याच्या लेकींनी घातली पोलिसांची वर्दी; दीक्षांत समारंभात बापाला आभाळ झालं ठेंगणं

एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी प्रशिक्षणानंतर पोलीस विभागात दाखल झाल्या.

    हिमाचल प्रदेश, 28 नोव्हेंबर : प्रत्येक बापाची इच्छा असते की त्याच्या मुलांनी खूप नाव कमवावं. त्यातही मुलगी असेल तर बापाच्या ह्रदयात मुलीसाठीचा हळवा कोपरा नेहमी तिला उत्तुंग यश मिळावं यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देत असतो. मात्र जेव्हा मुली आपल्या बापाचं नाव मोठं करतात तेव्हा त्यांच्या ऊर भरून येतो. जगाचं सर्व सुख मिळाल्याचा आनंद होतो. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) घडली आहे. एका चहावाल्याने आपल्या दोन्ही मुलींना खूप शिकवलं. त्यांना मोठं केलं. आज त्या मुलींनी बापाचं नाव रोशन केलं आहे. या मुली एकत्रच हिमाचल पोलीस विभागात भरती झाल्या आहेत. (Police uniforms worn by tea vendors) या मुलींच्या वडिलांंचं लहानसं चहाचं दुकान आहे. मात्र मुलींसाठीहीचं स्वप्न खूप मोठं होतं. मुलींनी अनुकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं व त्या आज पोलीस दलात भरती झाल्या आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांगोरा येथील डरोह पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दीक्षान्त समारंभात दोन सख्ख्या बहिणी आणि दोन भाऊ मुख्य आकर्षण ठरलं आहे. एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी प्रशिक्षणानंतर पोलीस विभागात दाखल झाल्या. त्याचवेळी दुसर्‍या कुटुंबातील दोन भावांनीही प्रशिक्षणानंतर खाकी युनिफॉर्म चढवला. मंडी जिल्ह्यातील डारंगजवळील मैगल गावातले श्याम लाल आणि काजो देवी यांच्या घरात जन्मलेल्या सुमन (वय 23) आणि शालू (वय 20) पोलिसात एकत्रित भरती झाल्या आहेत. कुटुंबाबरोबर गावालाही याचा खूप आनंद झाला आहे. हे ही वाचा-प्रिय सांता, तू तरी...समलैंगिक मुलाचं भावुक पत्र; वाचताना अंगावर काटा येईल या मुलींचे वडील श्याम लाल गावातच चहाचे दुकान चालवतात. दुसरीकडे मंडी जिल्ह्यातील बरोट गावचा साहिल (22) आणि अमित (वय 20) हेदेखील जवळचे भाऊ आहेत. दोघांना एकाच वेळी हिमाचल पोलिसात दाखल करण्यात आले आणि दोघांचे पीटीसी डरोह येथे झाले.  त्याचे वडील प्रेम चंद एका खासगी कंपनीत नोकरी करतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Police

    पुढील बातम्या