Home /News /career /

VIDEO: नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, ती देणारे तयार होण्यासाठीच नवीन शिक्षण धोरण

VIDEO: नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, ती देणारे तयार होण्यासाठीच नवीन शिक्षण धोरण

'विद्यार्थ्यांना जे शिकण्याची इच्छा आहे त्याचं शिक्षण घेता यावं याची सोय या नव्या धोरणामुळे होणार आहे', असं पंतप्रधान म्हणाले.

    नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : नवीन शिक्षण धोरणाचा (New Education Policy-2020 ) उद्देश नोकरीसाठी उमेदवार तयार करणं हा नसून, नवीन रोजगार उपलब्ध करणारे उद्योजक तयार करण्याचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शनिवारी सांगितलं. स्मार्ट इंडिया हॅकेथलॉनच्या अंतिम सोहळ्यानिमित्ताने (Smart India Hackathon 2020) त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणातून ज्ञान मिळावं आणि त्यातून नवं घडावं हा उद्देश या नव्या शिक्षण धोरणाचा आहे, असं मोदी म्हणाले. या शैक्षणिक सुधारणा संपूर्ण देशवासीयांच्या आकांक्षांचा विषय आहे. आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणारं हे धोरण आहे. विद्यार्थ्यांना जे शिकण्याची इच्छा आहे त्याचं शिक्षण घेता यावं याची सोय या नव्या धोरणामुळे होणार आहे. त्यामुळे आवडीच्या विषयांचं शिक्षण घेताना शाखेची अडचण येणार नाही, असंही मोदी यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना सांगितलं. भारताने जगाला उत्तमोत्तम संशोधक, शास्त्रज्ञ दिले आहेत. टेक्नॉलॉजी लीडर्सही भारताचेच आहेत. भारतीयांमध्ये ती ताकद आहे. योग्य दिशा मिळण्यासाठी शिक्षण आवश्यक. भारताने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवं धोरण आणलं आहे. शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचा उद्देश या दोन्हीत यामुळे बदल होतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या