मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

शिक्षकदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, देशातील 14500 शाळांना बनवणार HighTech

शिक्षकदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, देशातील 14500 शाळांना बनवणार HighTech

आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे

आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे

आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : 5 सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती राधाकृष्णन हे स्वतः शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक असल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील 14500 शाळांना HighTech करण्याची योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

काय म्हणाले मोदी -

"आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे - प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) या योजनेअंतर्गत भारतभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पूर्ण ऊर्जेने अंतर्भूत या मॉडेल स्कूल बनतील.", असे ट्विट मोदींनी केले आहे.

PM-SHRI या योजना अतंर्गत असलेल्या शाळांमध्ये शिक्षण देण्याची आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण पद्धत असेल. तसेच अध्यापनाच्या शोधकेंद्रित शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल. इतकेच नव्हे तर याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि यासह बऱ्याच काही आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की PM-SHRI शाळांचा NEP च्या भावनेने भारतातील लाखो विद्यार्थ्यांना आणखी फायदा होईल, असेही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

First published:

Tags: Narendra modi, School, School student