मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PCMC Recruitment: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 199 जागा रिक्त

PCMC Recruitment: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; तब्बल 199 जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पिंपरी-चिंचवड, 26 ऑक्टोबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) तब्बल 199 जागांसाठी पदभरती लवकरच होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या जागेच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार (Apprentice in various Trades) - एकूण जागा 199

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ उमेदवार (Apprentice in various Trades) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी दहावी बारावी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी

काही महत्त्वाच्या सूचना

ज्या उमेदवारांनी याआधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीशीप केली आहे अशा उमेदवारांना परत या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद घेणं आवश्यक आहे.

2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षांतील पास आउट उमेदवारांनाच या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

मराठी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

शैक्षणिक गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला उमेदवारांची कागदपत्रं तपासण्यात येणार आहेत.

उमेदवारांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा असणार आहे.

प्रशिक्षणासंबंधीचे आणि निवडीसंबंधीचे संपूर्ण अधिकार हे महानगरपालिकेकडे असणार आहेत.

इतकं मिळणार विद्यावेतन

शिकाऊ उमेदवार (Apprentice in various Trades) - संबंधित पदांनुसार 7000 - 8000 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब