मुंबई, 16 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेक ठिकाणी सरकारी नोकऱ्यांच्या रिक्त जागांची माहिती दिली जाते. अनेकदा ही माहिती फसवी आणि खोटी (Fake Information) असते. बहुतांश दावे चुकीचे असतात. अनेकदी वाचकांना ही माहिती अगदी खरी वाटते आणि तिथेच ते फसतात. आता सोशल मीडियावर एक नोटिफिकेशन व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नोकरीच्या ऑफर दिल्या जात आहेत. ही व्हायरल अधिकृत माहिती 'कौशल्य विकास मंत्रालया'ची (Ministry of Skill Development) आहे. 'कौशल्य विकास मंत्रालय' या नावाने व्हायरल झालेल्या या अधिसूचनेमध्ये, असा दावा केला जात आहे की या मंत्रालयाने रिक्त जागा काढल्या आहेत, ज्यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जाची फी 1645 रुपये आहे. मात्र हा दावा आणि अधिसूचना दोन्ही खोटे आहेत.
सोशल मीडियावर http://rashriyaunnatikendra.org ही बनावट वेबसाईट व्हायरल होत आहे. यासंदर्भात दावा केला जात आहे की ही वेबसाइट 'कौशल्य विकास मंत्रालया'शी जोडलेली आहे. या वेबसाइटवर असे लिहिले आहे की 'कौशल्य विकास मंत्रालयाने' सरकारी नोकरीच्या जागा काढल्या आहेत आणि सरकारी भरतीसाठी अर्ज फी म्हणून 1645 मागितले जात आहेत.
A #Fake website 'https://t.co/m7Ea313Quu' is claiming to be associated with the 'Ministry of Skill Development' and is asking for ₹1645 as an application fee for recruitment in govt. projects#PIBFactCheck
▶️@MSDESkillIndia is not linked to this organisation/website in any way pic.twitter.com/nesYUpdi6I — PIB Fact Check (@PIBFactCheck) December 19, 2021
पीआयबी फॅक्ट चेकने हे दावे शेअर केले आहेत आणि हे खोटे दावे असल्याचे म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की 'कौशल्य विकास मंत्रालयाने' कोणत्याही प्रकारची नोकरीची जाहिरात काढलेली नाही. स्किल इंडिया (Skill India) वेबसाइटने असा दावा केला आहे की अशी कोणतीही वेबसाइट भारत सरकारच्या स्किल इंडियाशी संबंधित नाही.
पीआयबी फॅक्ट चेकने अशा बनावट दाव्यांपासून दूर राहा असे म्हटले आहे. अशी खोटी वेबसाइट पाहिल्यावर तक्रार करा आणि ती कोणाशीही शेअर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.