मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सहावीत नापास होऊनसुद्धा सोडली नाही जिद्द,वाचा IAS रुक्मिणी रियारचा थक्क करणारा प्रवास

सहावीत नापास होऊनसुद्धा सोडली नाही जिद्द,वाचा IAS रुक्मिणी रियारचा थक्क करणारा प्रवास

अशाप्रकारे सुरु करा UPSC ची तयारी

अशाप्रकारे सुरु करा UPSC ची तयारी

आपल्या गावातील किंवा ओळखीतील एखादी 'अॅस्परन्ट' व्यक्ती जर स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) पास झाली तर आपल्याला तिचं फार कौतुक वाटतं. अशा व्यक्तीचे सत्कार समारंभ ठेवले जातात. तिचं गुणगान केलं जातं. स्पर्धा परीक्षा पास झालेल्या मुला-मुलींना समाजात मिळणारा आदर पाहून कधी-कधी आपल्याला त्यांचा हेवाही वाटतो. मात्र, त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट (Hardwork) केले आहेत ते आपण बघत नाही. स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी फक्त हुशार असून, चालत नाही तर सातत्य, चिकाटी आणि खंबीर मनाची आवश्यकता असते.

पुढे वाचा ...

 मुंबई, 21 एप्रिल-  आपल्या गावातील किंवा ओळखीतील एखादी 'अॅस्परन्ट' व्यक्ती जर स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) पास झाली तर आपल्याला तिचं फार कौतुक वाटतं. अशा व्यक्तीचे सत्कार समारंभ ठेवले जातात. तिचं गुणगान केलं जातं. स्पर्धा परीक्षा पास झालेल्या मुला-मुलींना समाजात मिळणारा आदर पाहून कधी-कधी आपल्याला त्यांचा हेवाही वाटतो. मात्र, त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट (Hardwork) केले आहेत ते आपण बघत नाही. स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी फक्त हुशार असून, चालत नाही तर सातत्य, चिकाटी आणि खंबीर मनाची आवश्यकता असते. नाहीतर अनेक विद्यार्थी असेदेखील आहेत, जे अपयशामुळे खचून जातात. या सर्व पार्श्वभूमीवर जर तुम्हाला सांगितलं, कधीकाळी इयत्ता सहावीत नापास झालेली एक मुलगी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत पास झाली आहे तर? ही मुलगी फक्त पासच नाही झाली तर तिनं देशभरातून दुसरा क्रमांकही मिळवला. रुक्मिणी रियार (Rukmani Riar) असं या दृढनिश्चियी मुलीचं नाव आहे. रुक्मिणी सध्या आयएएस (IAS Rukmani Riar) आहे. तिनं कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं. एकवेळ अशी होती जेव्हा रुक्मिणीवर 'सुमार बुद्धीमत्तेची विद्यार्थिनी' असा ठपका बसला होता. आता तिच रुक्मिणी आयएएस अधिकारी या प्रतिष्ठेच्या पदापर्यंत पोहचली आहे. तिचा हा प्रवास कसा होता, याबाबत अमर उजालानं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रुक्मिणी रियार पंजाबमधील गुरुदासपूरची (Gurdaspur) रहिवासी आहे. रुक्मिणीनं 2011 मध्ये झालेल्या यूपीएससी परिक्षेत ऑल इंडिया (AIR) दुसरी रँक मिळवली होती. मास्टर्स केल्यानंतर नियोजन आयोगात (Planning Commission) काम करत असताना तिच्या डोक्यात आयएएस होण्याचा विचार आला होता. नियोजन आयोगात असताना तिनं म्हैसूरमधील अशोदय आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळासारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये इंटर्नशिप केली होती. त्यानंतर दिल्लीच्या सेंटर फॉर इक्विटी स्टडीजच्या (Center for Equity Studies) सहकार्यानं गरीब वस्त्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीदेखील काम केलं. समाजातील विविध घटकांसोबत काम करत असताना तिनं आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिनं सेल्फ स्टडी केला आणि यश मिळवलं.

रुक्मिणीच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास, इयत्ता तिसरीपर्यंतचं शिक्षण गुरदासपूरमध्येच पूर्ण झालं. रुक्मिणीला लहान असताना अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. म्हणून तिच्या पालकांनी तिला इयत्ता चौथीपासून डलहौसीतील (Dalhousie) सेक्रेड हार्ट बोर्डिंग स्कूलमध्ये (Sacred Heart School) टाकलं. मात्र, तिथेदेखील सहावीत असताना ती नापास (Fail) झाली. ही गोष्ट तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. नापास झाल्यानंतर रुक्मिणी डिप्रेशनमध्ये (Depression) गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला नापास झाल्याची लाज वाटायची आणि कुटुंब, शिक्षक आणि मित्रांसमोर जायलाही भीती वाटायची. अनेक महिने तणावाखाली राहिल्यानंतर तिनं पुन्हा कधीही नापास न होण्याचा निर्धार केला. यानंतर ती पुन्हा कधीही नापास झाली नाही. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं अमृतसर येथील गुरु नानक देव युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतलं आणि सोशल सायन्सची (Social Science) डिग्री मिळवली. त्यानंतर तिनं मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून (TISS) मास्टर्स पूर्ण केलं. विशेष म्हणजे तिथे तिला गोल्ड मेडलही मिळालं होतं. तिनं आपल्या अपयशातून प्रेरणा घेऊन एक होतकरू विद्यार्थिनी अशी आपली ओळख निर्माण केली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला समाजासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली. म्हणून तिनं यूपीएससीची तयारी सुरू केली. कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस न करता तिनं सेल्फ स्टडीवर (Self Study) भर दिला. सहावी ते बारावी इयत्तेच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास सुरू केला. मुलाखतीच्या तयारीसाठी तिनं दररोज वर्तमानपत्रं वाचली. अनेक मॉक टेस्ट दिल्या. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर तिनं यूपीएससी परीक्षा पास केली आणि देशातून दुसरा क्रमांक मिळवला.

आपण असे अनेक विद्यार्थी पाहतो जे एकदा नापास झाल्यानंतर खचून जातात. काहीजण तर केवळ नापास होण्याच्या भीतीनं आत्महत्येसारख्या पर्यायांचा अवलंब करतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आयएएस रुक्मिणी रियार यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Upsc exam