• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • क्या बात है! भारताची 'ही' मोठी कंपनी कायम सुरु ठेवणार Work From Home; कर्मचाऱ्यांना असणार चॉईस

क्या बात है! भारताची 'ही' मोठी कंपनी कायम सुरु ठेवणार Work From Home; कर्मचाऱ्यांना असणार चॉईस

अशीही एक कंपनी आहे ज्या कंपनीनं वर्क फ्रॉम होम सुरु ठेवण्याचा निर्णय (Paytm continue to work from home) घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर: कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेलं विविध कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम लवकरच संपणार (Work from home ends) आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जावं लागणार असं दिसतंय. TCS, Infosys अशा काही टॉप IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला (Back to office after work from home) बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याउलट अशीही एक कंपनी आहे ज्या कंपनीनं वर्क फ्रॉम होम सुरु ठेवण्याचा निर्णय (Paytm continue to work from home) घेतला आहे. ऑफिसला येण्याचा किंवा न येण्याचा संपूर्ण निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर असणार आहे असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हो बरोबर आम्ही Paytm या कंपनीबद्दलच बोलत आहोत. Paytm नं आपल्या कामगारांना घरून काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी म्हंटलं आहे की कंपनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास भाग पाडणार नाही आणि 100 टक्के लवचिक कामाची पद्धत निवडेल. Career Tips: Job Interview दिल्यानंतर 'ही' कामं करायला चुकूनही विसरू नका आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत पेटीएमच्या कामकाजातून मिळणारा महसूल 62 टक्क्यांनी वाढून 8,90.8 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वीच्या काळात हेच प्रमाण 5,512 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये, कंपनीनं 4 लाख कोटी रुपयांचे एकूण व्यापारी मूल्य नोंदवलं. आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीची देयके आणि वित्तीय सेवा महसूल एकट्या रु. 689.4 कोटी इतका होता जो तिच्या एकूण महसुलात 77 टक्के योगदान देतो. जून 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 2.9 कोटी रुपयांचा तोटा झाला. मात्र या सर्व गोष्टीनंतरही Paytm नं वर्क फ्रॉम होम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचा Paytm आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: