Home /News /career /

क्या बात है! तुम्हाला आवडेल त्या ठिकाणहून करा ऑफिसचं काम; 'या' कंपनीचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

क्या बात है! तुम्हाला आवडेल त्या ठिकाणहून करा ऑफिसचं काम; 'या' कंपनीचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

 Paytm या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

Paytm या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

बऱ्याच IT कंपनी अंतर्गत लेव्हलला कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा प्लॅन तयार करत आहेत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये Paytm या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  मुंबई, 28 जून: करोना महासाथीची तिसरी लाटही आता संपुष्टात आली आहे आणि झपाट्याने रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे हळूहळू आयटी क्षेत्रातल्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) या पद्धतीऐवजी वर्क फ्रॉम ऑफिस (Work From Office) या जुन्या पद्धतीकडे वळवू पाहत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्या कामाचं हायब्रीड मॉडेल राबवत आहेत. मात्र आता पुन्हा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. त्यात बरेच IT ऑफिसेस सुरु होऊ लागले आहेत. बऱ्याच IT कंपनी अंतर्गत लेव्हलला कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा प्लॅन तयार करत आहेत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये Paytm या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम घरून काम करण्यावर भर देत आहे. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा (Paytm CEO Vijay Shekhar Sharma) घरून काम करण्याचे फायदे सांगत आहेत. पेटीएमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं मोठी खुशखबर दिली आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा कंपनीकडून देण्यात आली आहे.
  पेटीएम कंपनीतील टेक्नॉलॉजी, बिझिनेस आणि प्रोडक्टसचं काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना घरून किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी काम करण्याची परवानगी दिली जाईल. कोरोना महामारीच्या काळात कंपनीने स्वीकारलेली रिमोट वर्किंग कल्चर यापुढेही कायम राहील अशी घोषणा पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी केली आहे.
  पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी ट्विटरवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात घरून काम करण्याचे फायदे स्पष्ट केले. आपल्या ट्विटर हँडलवर एक अॅनिमेटेड क्लिप शेअर करत शर्मा यांनी उघड केले की एका कर्मचाऱ्याला कार्यालयात येण्यासाठी किती वेळ वाया घालवावा लागतो, या काळात तो घरी शांतपणे झोपू शकतो किंवा इतर काही काम करू शकतो असं सांगण्यात आलं आहे.
  कोरोनाचे आकडे पुनः वाढत असताना पेटीएम कंपनीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता पेटीएम प्रमाणेच इतरही कंपन्या असाच निर्णय घेतात या हे बघणं महत्त्वाचं असेल.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Work from home

  पुढील बातम्या