Home /News /career /

ठरलं! पंतप्रधान मोदी 'या' महिन्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद; आताच 'या' स्टेप्स वापरून करा नोंदणी

ठरलं! पंतप्रधान मोदी 'या' महिन्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद; आताच 'या' स्टेप्स वापरून करा नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी (How to register for Pariksha pe Charcha) करा.

    मुंबई, 01 जानेवारी: शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या संवादाचा कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha pe charcha) फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांनाही सहभागी होता येणार आहे. शिक्षण मंत्रालयाने ट्विट केले की, “परीक्षा पे चर्चा फेब्रुवारी 2022 (Pariksha pe Charcha date) मध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी (How to register for Pariksha pe Charcha) करा. मंत्रालयानुसार, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक MyGov वेबसाइटवरील 'परीक्षा पे चर्चा 2022' विभागात नोंदणी करू शकतात. त्यावर स्पर्धेच्या आधारे 2050 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची निवड करून त्यांना 'परीक्षा पे चर्चा' किटही देण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात आणि जास्तीत जास्त 500 शब्दांमध्ये प्रश्न टाकू शकतात. नोकरीची सुवर्णसंधी! भारत राखीव बटालियनमध्ये 7वी पास उमेदवारांसाठी भरती यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेसंदर्भात काही विषय निश्चित करण्यात आले आहेत, ज्यात कोविड-19 दरम्यान परीक्षेचा ताण व्यवस्थापन धोरण, तुमच्या गावाचा आणि शहराचा इतिहास, आत्मनिर्भर भारतासाठी स्वयंनिर्भर शाळा, स्वच्छ भारत हरित भारत, पर्यावरण संरक्षण यांचा समावेश आहे. . शिक्षकांसाठीच्या विषयांमध्ये 'नवीन भारतासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण', 'कोविड महामारी: संधी आणि आव्हाने' यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 'बेटी पढाओ देश बचाओ', 'लोकल टू ग्लोबल : व्होकल फॉर लोकल' आणि 'आजीवन विद्यार्थी' असे विषय पालकांसाठी ठेवण्यात आले आहेत. यासाठी 20 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशाला दिलेल्या 'मन की बात'मध्ये 'परीक्षा पे चर्चा 2022' चा उल्लेख केला होता. दरवर्षी, परीक्षा सुरू होण्यापूर्वी, ते विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत 'परीक्षा पे चर्चा' आयोजित करतात, त्यांना विशिष्ट शिकण्याच्या टिप्स आणि तणाव कमी करण्याचे मार्ग देतात. Career Tips: Successful होण्यासाठी तुमच्याकडे 'हे' स्किल्स असणं आवश्यक; वाचा अशा पद्धतीनं करा नोंदणी (How to registration for Pariksha pe Charcha) सुरुवातीला mygov.in ओपन करा. होम पेजवरील मोहिमेच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तुमचा तपशील एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्याची हार्ड कॉपी काढून ठेवू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, PM narendra modi

    पुढील बातम्या