मुंबई, 27 जानेवारी: यंदा बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी संधी चालून आली आहे . 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाची सहावी आवृत्ती आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. परिक्षा पे चर्चा हा वार्षिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये पंतप्रधान आगामी बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेचा ताण आणि इतर मुद्द्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही पंतप्रधान देतात. यंदा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सामील होणार आहेत. काय असतील यंदाच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची वैशिष्ट्य जाणून घेऊया.
यावर्षी या कार्यक्रमासाठी 38.80 लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी सुमारे 15 लाख लोकांनी नोंदणी केली होती. परिक्षा पे चर्चा हा वार्षिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये पंतप्रधान आगामी बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेचा ताण आणि इतर मुद्द्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही पंतप्रधान देतात. 16 फेब्रुवारी 2018 रोजी स्टेडियममध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.
12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आज जारी होणार तुमचं हॉल तिकीट; या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध
देशाच्या राजधानीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर 27 जानेवारी रोजी परिक्षा पे चर्चाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन केले जाईल. प्रधान म्हणाले होते की, यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असून ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा 15 लाखांनी अधिक आहे.
तुमच्या जॉब अप्लिकेशनसोबत Cover Letter नसेल तर नोकरी मिळत नाही? एक्सपर्ट्सनी दिलं परफेक्ट उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता ठाणे महापालिकेच्या शासकीय शाळेत परीक्षा या विषयावरील चर्चा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसंच पंतप्रधान आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
विद्यार्थी असे डाउनलोड करू शकतात सर्टिफिकेट्स
परिक्षा पे चर्चा प्रमाणपत्र माय गव्ह पृष्ठाच्या अधिकृत साइट, innovateindia.mygov.in वरून डाउनलोड केले जाऊ शकते. कार्यक्रम संपल्यानंतर लवकरच, प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Career, Career opportunities, Education, Pm modi