मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तुमच्याही मुलांनी इतरांपेक्षा स्मार्ट व्हावं असं वाटतंय? मग त्यांना शिकवताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

तुमच्याही मुलांनी इतरांपेक्षा स्मार्ट व्हावं असं वाटतंय? मग त्यांना शिकवताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

 'या' गोष्टी ठेवा लक्षात

'या' गोष्टी ठेवा लक्षात

तुम्हालाही तुच्या मुलांनी सतत यश मिळवावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत वागताना त्यांना शिकवताना काही गोष्टी करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 सप्टेंबर: आजकालच्या काळात प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी सर्वच क्षेत्रात यश मिळवावं असं वाटत असतं. मात्र यासाठी पालक काहीही करायला तयार असतात. अनेकदा आपल्या मुलांना चांगला वागावं किंवा त्यांना यश मिळावं म्हणून पालक मुलांना चुकीची वागणूक देतात. तसंच मुलांना वाईट गोष्टी शिकवून अप्रत्यक्षपणे मुलांना बिघडवतात. पण तुम्हालाही मुलांनी सतत यश मिळवावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत वागताना त्यांना शिकवताना काही गोष्टी करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

अभ्यासादरम्यान खेळणी वापरा

मुलांना वाचण्यापेक्षा खेळायला आवडते. कल्पना करा की मुलाला खेळाप्रमाणे अभ्यासाचा आनंद मिळू लागला तर सगळे टेन्शन संपेल. पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खेळणी वापरू शकतात. मुले फक्त पुस्तकातूनच शिकतात असे नाही. खेळण्यांमधून मुलांना रंग, मोजणी शिकवली जाऊ शकते.

मुलांना टास्क द्या

मुलांवर जास्त ओझे पडणार नाही याची काळजी घ्या. मुलांना रोज छोटी-मोठी टास्क द्या आणि ती पूर्ण करायला सांगा, टास्क पूर्ण केल्यावर नक्कीच कौतुक करा. जर ते कार्य पूर्ण करू शकत नसतील तर कार्य पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करा.

रिटायर्ड आहात पण घरी कंटाळा येतो? मग राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

अभ्यासावर दबाव आणू नका

लहान वयातच पालक आपल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर टाकतात, त्यामुळे मुलांचा योग्य विकास होत नाही. त्यामुळे मुलांवर कधीही अभ्यासाचा दबाव आणू नका, तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वाचायला सांगा आणि त्यांना अभ्यासाची सक्ती करू नका. जेव्हा तुम्ही मुलांसोबत बसाल तेव्हा त्यांना प्रेमाने प्रश्न विचारा आणि उत्तर देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू नका.

मुलांसाठी योग्य वेळापत्रक बनवा

आपण प्रौढ देखील आपली अनेक कार्ये नीट करू शकत नाही, मग मुलांना आणखी मदतीची गरज असते. मुलांना स्वतः अभ्यासाला बसता येईल एवढी समज नसते, तेही ठराविक वेळी. अशा स्थितीत पालकांनी स्वत: त्यांच्या अभ्यासाची वेळ ठरवून ते वेळापत्रक रोज पूर्ण करण्यास मदत करावी.

काय सांगता! 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेजची नोकरी आता तुमची; 'हे' कोर्सेस कराच

मुलांच्या चुका दुरुस्त करा

लहानपणी चुका सर्रास होतात, हा सुद्धा शिकण्याचा एक मार्ग आहे. वेळोवेळी मुलांच्या गृहपाठाची प्रत पहा आणि त्यात झालेल्या चुका दुरुस्त करा आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Parents and child