पंढरपूर, 17 जून: घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतमजुराच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथील सोमानाथ नंदू माळी (Somnath Nandu Mali) या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.
पंढरपूरच्या सोमनाथ माळी या तरुणाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. भारतातील एकूण दहा संशोधकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी सोमनाथ माळी याचाही समावेश आहे. सोमनाथ माळी हा शास्रज्ञ म्हणून निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव तरुण आहे.
पंढरपूरच्या सोमनाथची ISRO मध्ये निवड pic.twitter.com/3HaFRf6tVI
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2021
आता शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी मिळणार प्रवेश; शिक्षण विभागाचा निर्णय
तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराबाई स्पेस सेंटर येथे सोमनाथ माळी याची वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमनाथ याची घरची परिस्थिती खूपच हालाकीची आहे आई-वडिल शेतमजुर म्हणून काम करतात आणि अशा परिस्थितीतही सोमनाथ याने घवघवीत यश मिळवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सोमनाथचे आई-वडील हे दुसऱ्यांच्या शेतात जावून मोलमजुरी करतात.
एमटेक पर्यंतचं शिक्षक पूर्ण केल्यावर सोमनाथ याने इन्फोसेसमध्ये नोकरी स्वीकारली. तेथे त्याला विमान इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सोमनाथने इस्रोमध्ये जाण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2019मध्ये अर्ज केला. अखेर सोमनाथची 2 जून रोजी इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Isro, Pandharpur