नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: कोरोना महामारीमुळे
(Corona) गेल्या दीड वर्षांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यानं शाळेत न जाता घरूनच अभ्यास करावा लागत आहे. मात्र शाळेत शिक्षकांच्या सानिध्यात अभ्यास करण्यात आणि घरी ऑनलाईन शिक्षण
(Online school education) घेण्यात फरक आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे काही राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र माध्यमिक वर्गाच्या आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा सुरु
(Schools Reopen) करण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. मात्र याचा परिणाम वाईट होत आहे असं पालकांचं म्हणणं आहे. यासंदर्भात केलेल्या एका सर्व्हेमधून
(Survey regarding school students) पालकांनी मांडलेलं म्हणणं समोर आलं आहे.
15 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक सर्वेक्षण
(Survey) करण्यात आलं आहे. अर्थशास्त्रज्ञ जीन ड्रेझ, रितिका खेरा आणि संशोधक विपुल पैक्रा यांच्यासह सुमारे 100 स्वयंसेवकांनी केलेल्या या सर्वेक्षणात 1400 शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वंचित कुटुंबांतील मुलांवर ऑनलाइन शिक्षणाचा किती विध्वंसक परिणाम झाला आहे याबाबत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. मात्र या सर्वेक्षणातून बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणाचा धक्कादायक निकाल
सर्वेक्षणात समाविष्ट केलेली अर्धी मुलं काही शब्दांपेक्षा जास्त वाचूच शकली नाहीत, तर काहींना लिहिण्यास कठीण वाटत होतं. बहुतेक पालकांना असं वाटतं की शाळेच्या अभावामुळे त्यांच्या मुलांच्या वाचन आणि लिहिण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालक आता शाळा उघडण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
हे वाचा -
Exam Tips: परीक्षेत घ्यायचा असेल पहिला नंबर तर 'या' टिप्सकडे करू नका दुर्लक्ष
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती गंभीर
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची विदारक परिस्थिती सांगणारा खुलासा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. ग्रामीण भागात केवळ 8 टक्के विद्यार्थी नियमित ऑनलाईन वर्ग करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 37% विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीयेत. गरीब कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासापासून वंचित आहेत असं सांगितलं जात आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांना ऑफलाईन असाइनमेंट गृहपाठ म्हणून देण्यास सांगितलं होतं. मात्र या सर्वांचे रिपोर्ट समाधानकारक नाहीत असं सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे शाळा परत सुरु करणं ही आता काळाची गरज आहे असं पालकांनाही वाटू लागलं आहे असं या सर्वेक्षणातून दिसत आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांसाठी शाळा लवकर सुरु होतात की नाही हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.