मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Green Job म्हणजे नक्की काय? या वर्षात तब्बल 9 लाख लोकांना मिळाली नोकरी; भविष्यातही जॉब्स

Green Job म्हणजे नक्की काय? या वर्षात तब्बल 9 लाख लोकांना मिळाली नोकरी; भविष्यातही जॉब्स

ग्रीन सेक्टरमधील jobs

ग्रीन सेक्टरमधील jobs

भविष्यातही या क्षेत्रात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यात सरकारी नोकऱ्याही असतील

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  26 सप्टेंबर:   हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसू लागल्यावर जगातील अनेक देश पर्यावरणाविषयी जागरूक झाले आहेत. पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याच माध्यमातून नवीन रोजगारही उपलब्ध होतो आहे. त्याला ग्रीन जॉब्ज अर्थात हरित रोजगार असं म्हटलं जातं. चीन, अमेरिका, युरोपमधल्या देशांच्या बरोबरीनं भारतातही अशा प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होते आहे. गेल्या वर्षभरात ग्रीन जॉब्जच्या क्षेत्रात देशात जवळपास 9 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. भविष्यातही या क्षेत्रात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यात सरकारी नोकऱ्याही असतील. त्याबाबत टीव्ही 9 हिंदीनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

आकडेवारी काय सांगते?

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी या दोन संस्थांनी यंदाचा वार्षिक अहवाल दिला आहे. त्यात जगातील विविध देशांमधील ग्रीन जॉब्जविषयी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, जगातील ग्रीन जॉब्जमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जगभरात 2020-21मध्ये 1 कोटी 27 लाख ग्रीन जॉब्ज निर्माण झाले होते. यात 63.6 टक्के इतका मोठा वाटा आशियाई देशांचा होता. सर्वांत जास्त रोजगार चीनमध्ये उपलब्ध झाला. तिथे 54 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. या आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत भारतात हरित क्षेत्रात 34 लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज आहे.

ना कोणती परीक्षा, ना कोणती टेस्ट; पुण्यात थेट मिळवा नोकरी; अवघ्या 2 दिवसात मुलाखत

ग्रीन जॉब्ज म्हणजे काय?

पर्यावरण रक्षणाच्या दिशेनं काम करणारी जी क्षेत्रं आहेत, त्यात मिळणाऱ्या नोकऱ्यांना ग्रीन जॉब म्हणतात. उदा. सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, हायड्रोपॉवर या क्षेत्रातील नोकऱ्या ग्रीन जॉब्ज अंतर्गत येतात. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात उपलब्ध रोजगार ग्रीन जॉब्ज म्हणवला जातो.

रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात जो रोजगार निर्माण होतो आहे, त्यात वेगानं विकसित होणारं क्षेत्र सोलर फोटोव्होल्टिकचं आहे. त्याच्या खालोखाल विंड एनर्जी, हायड्रोपॉवर आणि मग बायोएनर्जी हे आहे. रिपोर्टमधील आकडेवारीनुसार, 2021-22मध्ये भारतात 2.17 लाख नोकऱ्या सोलर फोटोव्होल्टिक या क्षेत्रात देण्यात आल्या, तर 4.14 लाख नोकऱ्या हायड्रोपॉवरमध्ये निर्माण झाल्या.

1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk साठी अर्जाची उद्याची शेवटची तारीख

देशातील उत्पादन वाढवण्यासाठी भारतानं एप्रिल 2022 पासून सगळ्या मोड्युल्सच्या आयातीवर 40 टक्के आणि विक्रीवर 25 टक्के कर लादला आहे. या क्षेत्रातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतही (PLI) दिली जाणार आहे. हरित ऊर्जेबाबतचे प्रकल्प विकसित करणाऱ्या व्यक्तींना ही आर्थिक मदत दिली जाईल. याचाच अर्थ या क्षेत्रातील उत्पादन वाढण्यासाठी कंपन्या सुरू होतील. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने विविध प्रकल्प हाती घेत रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याने देशाच्या विकासालाही हातभार लागतो आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job