Government Jobs : 10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, अशी होणार निवड
Government Jobs : 10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, अशी होणार निवड
ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने (Ordnance Factory Board)10 वी पास उमेदवारांकडून 6060 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये 3 हजार 847 ITI आणि 2219 पदं बिगर आयटीआय तरुणांसाठी आहेत.
दिल्ली, 14 जानेवारी : OFB Recruitment 2020: ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने (Ordnance Factory Board)10 वी पास उमेदवारांकडून 6060 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये 3 हजार 847 ITI आणि 2219 पदं बिगर आयटीआय तरुणांसाठी आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 10 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. या उमेदवारांची नियुक्ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, चंदीगड, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये केली जाईल.
पदांची वर्गवारी
एकूण पदं - 6, 060
आयटीआय - 3, 847
नॉन आयटीआय - 2, 2219
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी पात्र उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळांमध्ये दहावी पास होणं गरजेचं आहे. अर्जदाराकडे नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अॅप्रेंटिस सर्टिफिकेट (NAC) होणं आवश्यक आहे. बिगर आयटीआय उमेदवार 10 वी पास होणं गरजेचं आहे. या परीक्षेत त्या उमेदवाराला 50 टक्के गुण हवे. गणित आणि विज्ञान या विषयात 40 टक्के गुणं मिळवणं आवश्यक आहे.
(हेही वाचा : ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं)वयोमर्यादा
या उमेदवाराचं कमीत कमी वय 15 वर्षं आणि जास्तीत जास्त वय 24 वर्षं हवं.
अशी होणार निवड
या पदांसाठी उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होईल. ITI आणि नॉन ITI या दोन श्रेणींसाठी वेगवेगळ्या मेरीट लिस्ट असतील. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ofb.gov.in/ वर जाऊ शकता. दहावी पास असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.त्याचबरोबर सरकारी नोकरी सुरक्षित असल्याने हा पर्यायही तरुणांना निवडता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.