Home /News /career /

बेरोजगारांसाठी मोठी संधी, क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

बेरोजगारांसाठी मोठी संधी, क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ

भरती प्रक्रियेस मुदतवाढ मिळाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना चांगली संधी निर्माण झाली आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : लॉकडाऊन काळात रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अनेक कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने नोकऱ्या कमी होताना दिसत आहेत. मात्र अशातच क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ मिळाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना चांगली संधी निर्माण झाली आहे. कोणत्या पदासाठी आहेत संधी? पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे पदाचे नाव : ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II जनरल बँकींग ऑफिसर (मॅनेजर) शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे पदाचे नाव : ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर (मॅनेजर) 1) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह ईलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि समकक्ष पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे 2) चार्टर्ड अकाऊंटंट (CA) शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट तसेच एक वर्षाचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे 3) लॉ ऑफिसर शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह विधी पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे 4) ट्रेझरी मॅनेजर शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए तसेच एक वर्षाचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे 5) मार्केंटींग ऑफिसर शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटींग) तसेच एक वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे 6) ॲग्रीकल्चरल ऑफिसर शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / Pisciculture पदवी किंवा समकक्ष तसेच दोन वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे पदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पाच वर्षांचा अनुभव वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 नोव्हेंबर 2020
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या