नवी दिल्ली 16 जून : संरक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Defence) एएससी सेंटर (साऊथ) -2 एटीसीने ग्रुप Cच्या विविध पदांसाठी (Group C recruitment) अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत सिव्हिल मोटर ड्रायव्हर (Civil motor driver), क्लिनर (Cleaner), कुक (Cook) आणि सिव्हिलियन इन्स्ट्रक्टर (Civilion instructor) यासह अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. विशेष म्हणजे दहावी पास आणि काही कलांमध्ये पारंगत अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
ग्रुप C पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. आवश्यक सेल्फ अटेस्टेड (self attested) कागदपत्र पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख भरतीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 30 दिवसांची आहे. याची अधिसूचना 12 जून रोजी जारी करण्यात आली होती.
कोणत्या पोस्टसाठी किती जागा
एकूण रिक्तता - 100
सिव्हिल मोटर चालक - 42 पोस्ट
क्लिनर - 40 पोस्ट
कूक - 15 पोस्ट
नागरी केटरिंग प्रशिक्षक - 03 पोस्ट
हे वाचा - संध्याकाळी या गावात सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही
दरमहा वेतन
सिव्हिल मोटर चालक - दरमहा 19900 रुपये
क्लिनर - दरमहा 18000 रुपये
कूक - दरमहा 19900 रुपये
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर - दरमहा 19900 रुपये
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल मोटर ड्रायव्हर - हेवी आणि लाइट मोटर वाहन परवान्यासह दहावी पास. दोन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव देखील आवश्यक आहे.
क्लिनर- दहावी पास आणि संबंधित कामात पारंगत असावं.
कूक - दहावी पास आणि स्वयंपाक करण्यात कुशल असावा. एक वर्षाचा अनुभव असणार्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर - केटरिंगमधील डिप्लोमासह दहावी पास. किमान एक वर्षाचा केटरिंग इन्स्ट्रक्टरचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा - 18 ते 25 वर्षे.
हे वाचा - चांगली नोकरी मिळवायचीये? मग बायोडेटामध्ये 'या' चुका कधीच करू नका
या पत्त्यावर पाठवा अर्ज
पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (दक्षिण) -2 एटीसी, अॅडव्हान्स पोस्ट, बंगलोर -07
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.