मुंबई, 17 मार्च: ओएनजीसी अर्थात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पॉरेशन लिमिटेडमध्ये सध्या पदभरती प्रक्रिया सुरू आहे. ओएनजीसीने उत्पादन आणि इलेक्ट्रिकल शाखेतील सेवानिवृत्त ओएनजीसी अधिकाऱ्यांसाठी सरफेस टीममध्ये कनिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच अर्थ ओएनजीसीतील निवृत्त अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. ओएनजीसी रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, सध्या सहा जागा दोन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 मार्च 2023 पासून सुरू झाली असून, त्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रता निकष, वेतन नेमके काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया. `स्टडी कॅफे डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे.
ओएनजीसी रिक्रुटमेंट 2023 च्या नोटिफिकेशननुसार, ओएनजीसीच्या उत्पादन/इलेक्ट्रिकल विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरफेस टीमच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदभरती प्रक्रियेतून सरफेस टीम उत्पादन विभागात ज्युनिअर कन्सल्टंटच्या चार जागा आणि सरफेस टीम इलेक्ट्रिकल विभागात ज्युनिअर कन्सल्टंटच्या दोन जागा भरण्यात येणार आहेत.
CRPF Recruitment: देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स; CRPF मध्ये तब्बल 9212 पदांसाठी भरती; करा अप्लाय
सरफेस टीम उत्पादन विभागासाठी इच्छुक उमेदवार हा ओएनजीसीचा सेवानिवृत्त अधिकारी असावा. त्याने E1 ते E3 स्तरावर उत्पादन किंवा इलेक्ट्रिकल शाखेत काम केलेले असावे. त्याला ओएनजीसीत किमान पाच वर्षांचा इन-लाइन अनुभव असावा.
सरफेस टीम इलेक्ट्रिकल विभागासाठी इच्छुक उमेदवार हा E1 ते E3 स्तरावरील इलेक्ट्रिकल शाखेतून निवृत्त ओएनजीसी एक्झिक्युटिव्ह असावा. त्याला ओएनजीसीतील इलेक्ट्रिकल ऑपरेशनमध्ये किमान पाच वर्षाचा इन-लाइन अनुभव असावा. या दोन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे.
1-2 नव्हे तब्बल 5000 जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका; करा अप्लाय
निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी दरमहा अनुक्रमे 27,000 आणि 28,350 रुपये मानधन दिलं जाईल. या शिवाय जॉइनिंग डेटपासून इतर अत्यावश्यक लाभ म्हणून दरमहा 15,000 रुपये दिले जातील.
ओएनजीसी रिक्रुटमेंट 2023 च्या नोटिफिकेशननुसार, इच्छुक उमेदवारांनी रितसर भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या अर्जाची स्कॅन कॉपी GUPTASOURAV@ONGC.CO.In किंवा METHANISUNNY@ONGC.CO.IN या ईमेलवर जाहिरातीच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार विहित नमुन्याचा अर्ज सरफेस व्यवस्थापक कार्यालय, पहिला मजला, केडीएम भवन, पलावासना चौकी, मेहसाणा, गुजरात - 383003 या पत्त्यावर पाठवू शकतात. उमेदवाराने ओएनजीसीचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राची प्रत आणि सेवा कालावधीदरम्यान मिळवलेल्या गुणवत्ता प्रमाणपत्रांची प्रत इतर आवश्यक तपशीलासह पाठवावी. उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखद्वारे केली जाईल. उमेदवाराने सबमिशनवेळी सबमिट केलेल्या ई-मेलवर संपर्क साधला जाईल.
इच्छुक उमेदवारांची निवड तीन प्रमुख निकषांवर केली जाईल. यात ओएनजीसीतील कामाचा अनुभव (10 गुण), शैक्षणिक पात्रता (10 गुण) आणि लेखी परीक्षा (60 गुण) यांचा समावेश असेल. स्क्रीनिंगच्या पहिल्या फेरीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत हे दोन्ही टप्पे एकाच दिवशी होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams