मुंबई, 22 मार्च: सरकारी व चांगल्या पगाराची नोकरी अनेकांना हवी असते. अशा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ONGC) सध्या नोकरभरती सुरू आहे. ज्युनिअर कन्सल्टंट आणि असोसिएट कन्सल्टंट या दोन पदांसाठीच्या 38 जागांसाठी ही नोकरभरती केली जात आहेय. भारतीय उमेदवारांसाठी ही पदभरती असून, त्याचा कालावधी 2 वर्षांचा असेल. ओएनजीसीने अधिकृत अधिसूचनेद्वारे ही पदभरती जाहीर केली आहे. 'स्टडीकॅफे'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
ओएनजीसीच्या अधिकृत सूचनेमध्ये दोन्ही पदांसाठीच्या जागा, त्यासाठीचा अपेक्षित अनुभव व पात्रता जाहीर करण्यात आलीय.
क्या बात है! आता परदेशात जॉबसाठी वाट बघण्याची गरजच नाही; 'या' देशांमध्ये मिळतोय जॉब सीकर Visa
पात्रता
ज्युनिअर कन्सल्टंट (E1 To E3Level) या पदासाठीच्या 19 जागांसाठी भरती केली जात आहे. असोसिएट कन्सल्टंट (E4 To E5) या पदासाठीच्याही 19 जागांची भरती होणार आहे. या पदांसाठी ओएनजीसीमधून निवृत्त झालेले कार्यकारी पदावरचे अधिकारी अर्ज करू शकतात. E1 ते E3 पातळीवरून निवृत्त झालेले उमेदवार ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी, तर E4 ते E5 पातळीवरून निवृत्त झालेले उमेदवार असोसिएट कन्सल्टंट पदासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे किमान 5 वर्षांचा अनुभव असावा लागेल. E4 ते E5 पातळीवरचे उमेदवार नसल्यास E6 पातळीवरच्या उमेदवारांचाही विचार केला जाऊ शकतो असं कंपनीने म्हटलंय.
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 65 वर्षांच्या आतले असावेत, असं ओएनजीसीनं म्हटलंय. पदभरती करताना उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन नंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांना महिन्याला साधारणपणे 70 हजार रुपये पगार मिळू शकतो. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज पोस्टाने किंवा ई-मेलद्वारेही पाठवू शकतात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत अर्ज पाठवावा असं अधिकृत सूचनेमध्ये म्हटलंय. उमेदवारांनी त्यांचे अर्ज-Room No 14C, 1st Floor, KDM Bhavan, Phase-II, ONGC Mehsana Asset, Palavasana, Gujrat या पत्त्यावर पाठवावेत. ऑनलाइन अर्ज karmakar_somnath@ongc.co.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.
Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा
मानधन
ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी पहिल्या वर्षाला मासिक मानधन 27 हजार रुपये देण्यात येईल. त्यात कन्व्हेयन्स रिएम्बर्समेंट 6500 रुपये, रिएम्बर्समेंट फॉर ऑफिस अॅट रेसिडन्स 6500 रुपये आणि कम्युनिकेशन सेवांसाठी 2 हजार रुपये असे एकूण 42 हजार रुपये मानधन मिळेल. दुसऱ्या वर्षी मानधनात वाढ होऊन एकूण मानधन 43,350 रुपये असं होईल.
देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती
असोसिएट कन्सल्टंट पदासाठी पहिल्या वर्षी 40 हजार रुपये मासिक मानधन, 13 हजार रुपये कन्व्हेयन्स रिएम्बर्समेंट, रिएम्बर्समेंट फॉर ऑफिस अॅट रेसिडन्ससाठी 13 हजार रुपये व कम्युनिकेशन सेवांसाठी 2 हजार रुपये असे एकूण 68 हजार रुपये मानधन असेल. दुसऱ्या वर्षी मासिक मानधन वाढून 42 हजार रुपये होईल. त्यामुळे एकूण मानधन 70 हजार रुपये मिळेल.
ओएनजीसीमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं पुन्हा एकदा कामाची संधी दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams