मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

एका आर्टिकलने बदलून टाकलं आयुष्य, कंपनी सेक्रेटरी तरुणी झाली IAS

एका आर्टिकलने बदलून टाकलं आयुष्य, कंपनी सेक्रेटरी तरुणी झाली IAS

आयएएस सोनल गोयल

आयएएस सोनल गोयल

IAS सोनल गोयल यांचा प्रवास जाणून घेतल्यानंतर तुम्हाला केवळ प्रेरणाच मिळणार नाही तर प्रेरणेसोबतच तुम्ही त्यांच्या धैर्याची नक्कीच स्तुती कराल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नवी दिल्ली, 21 जानेवारी : बहुतांश आयएएस अधिकाऱ्यांची कहाणी खूपच रंजक आहे. त्यांच्या मेहनतीपासून ते 10वीच्या मार्कशीटपर्यंत आणि सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे अनेक अधिकारी चर्चेत राहतात. सक्सेस स्टोरी मालिकेत आज अशाच एका यशस्वी अधिकारी IAS सोनल गोयल यांच्या यशस्वी प्रवासाबाबत जाणून घेऊयात.

IAS सोनल गोयल यांनी 2008 मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक अधिकारी आहेत. त्यांचा यशस्वी प्रवास खरोखरच रंजक आहे. त्यांच्या प्रवास जाणून घेतल्यानंतर तुम्हाला केवळ प्रेरणाच मिळणार नाही तर प्रेरणेसोबतच तुम्ही त्यांच्या धैर्याची नक्कीच स्तुती कराल.

कंपनी सेक्रेटरी म्हणून करिअरला सुरुवात -

IAS सोनल गोयल यांचा जन्म हरियाणातील पानिपत येथे झाला होता. पण त्यांनी आपले शिक्षण दिल्लीतून केले. 12वी नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. सीएसच्या अभ्यासादरम्यान त्यांनी नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. सोनल गोयल या एका फर्ममध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणूनही काम करत होत्या.

अशाप्रकारे लागले यूपीएससीचे वेड -

आयएएस सोनल गोयल यांना नागरी सेवा किंवा यूपीएससी परीक्षेचे कोणतेही विशिष्ट ज्ञान नव्हते. सीएस (कंपनी सचिव) च्या अभ्यासादरम्यान त्यांनी एका मासिकात UPSC परीक्षेशी संबंधित लेख वाचला होता. तेव्हाच पुढे जाऊन आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

वडिलांनी दिली होती अनमोल शिकवण -

सोनल गोयल यांच्या वडिलांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांना खूप मौल्यवान शिकवण दिली होती. जेव्हा सोनल यांनी UPSC परीक्षेबद्दल कुटुंबाला सांगितले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना बॅकअप प्लॅन ठेवण्यास सांगितले. त्यामुळेच सीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एलएलबीचा अभ्यास सुरू केला.

हेही वाचा - वडिलांसोबत शेती करणारा रवी झाला IAS, भन्नाट आहे त्याची जर्नी

IAS सोनल गोयल यांनी 2006 मध्ये पहिला प्रयत्न केला होता. पण त्यात त्या अपयशी ठरल्या होत्या. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी दुप्पट तयारी करून स्पर्धा परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी त्यात 13 वी रँक मिळवली. यूपीएससी परीक्षेसाठी दोन प्रयत्न पुरेसे आहेत. कारण पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाल्यास तुमच्या चुका समजू शकतात, असे त्यांचे मत आहे.

सोनल गोयल अभ्यासात खूप हुशार होत्या. परंतु यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि म्हणूनच बॅकअप योजना असणे देखील आवश्यक होते. त्यांचा हा यशस्वी प्रवास आणि त्यांनी दिलेला सल्ला हा आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc