Home /News /career /

मोठी बातमी! आता कॉलेजच्या परीक्षांमध्येही मिळणार Extra वेळ; उदय सामंतांची घोषणा

मोठी बातमी! आता कॉलेजच्या परीक्षांमध्येही मिळणार Extra वेळ; उदय सामंतांची घोषणा

ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला होता. मात्र दोन वर्षांनंतर थेट ऑफलाईन परीक्षा देताना वेळ वाढवून द्यावी ही मागणी विद्यार्थ्यांकडून येत होती.

  मुंबई, 13 एप्रिल: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला (Offline exams in Maharashtra) विद्यार्थ्यांचा विरोध होता. मागणीला न जुमानता परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत. मात्र या परीक्षांसाठी राज्य सरकार तर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांनो, कॅम्पस प्लेसमेंटसाठी Online Interview देताना 'या' गोष्टी कराच गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. मात्र आता काही दिवसांआधी राज्यातील सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि सर्व कॉलेजेस सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. या परीक्षांमध्ये आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ (Extra time for Exams in Maharashtra) देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांमध्ये पंधरा मिनिटं प्रति तास इतका अतिरिक्त वेळ (Extra time college exams in Maharashtra) देण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. स्वतः ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला होता. मात्र दोन वर्षांनंतर थेट ऑफलाईन परीक्षा देताना वेळ वाढवून द्यावी ही मागणी विद्यार्थ्यांकडून येत होती. यानंतर परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरूंच्या बैठकीत उच्च शिक्षण मंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यूनिव्हर्सिटीतून एकाच वेळी दोन डिग्री घेता येणार, UGC ची मोठी घोषणा
  किती वाढवणार वेळ
  ज्या क्षेत्रातील परीक्षा जितक्या तासाच्या असणार आहेत त्यापैकी प्रतितास पंधरा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार आहेत. म्हणजेच जर परीक्षा ही तीन तासाची असेल तर पाऊण तास वेळ अतिरिक्त मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव नसला तरी विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Education, Exam Fever 2022, Maharashtra News

  पुढील बातम्या