मुंबई, 27 ऑक्टोबर: कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून कित्येक कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम (Work from home) सुरु होतं. मात्र आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये (Back to office) बोलवण्यास सुरुवात केली आहे. गेली दीड वर्ष ऑफिसमधील सर्व कामं घरून करताना कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे ऑफिसमधील नियम पाळण्याची गरज पडत नव्हती. मात्र आता ऑफिसमध्ये काम करताना त्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. ऑनलाईन मिटिंग्स (Online Meetings Ends) बंद होणार असून आता प्रत्यक्ष कॉन्फरन्स रूम मिटींग्स (Office meetings tips) होणार आहेत. म्हणूनच अशा मिटींग्समध्ये Boss समोर बोलताना कशा पद्धतीनं बोलावं आणि वागावं (How to behave in Office meetings) याबद्दलच्या सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे इतरांपेक्षा तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी (How to improve personality in Office meetings) दिसेल. चला तर मग जाणून घेऊया टिप्स.
अनेकवेळा काही आपत्कालीन परिस्थिती आली की, कोणतीही तयारी न करता मिटींग्सला उपस्थित राहाणं भाग पडतं. मिटींग्स मोठ्या स्तरावरची असो किंवा छोटी, त्यामध्ये जाण्यापूर्वी या गोष्टींचा अवश्य विचार नक्की करा आणि टिप्सचा उपयोग करा.
तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या. मोठ्या आवाजात बोलू नका. तसंच, आवाज इतका कमी नसावा की कोणाला ऐकू येणार नाही, हेही लक्षात ठेवा.
राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार? लागू होऊ शकतं दिल्ली स्कुल मॉडेल; वाचा
तुम्ही कोणत्याही विषयावर बोलत असाल, तुमच्याकडे त्याच्याशी संबंधित सर्व आवश्यक माहिती असली पाहिजे. जर कोणी तुम्हाला काही विचारले तर तुम्ही उत्तर देण्याच्या स्थितीत असले पाहिजे.
विचार न करता कधीही बोलू नका. बोलताना प्रसंग, माणसं आणि ठिकाण याकडे विशेष लक्ष द्या.
दोन लोकांमध्ये कधीही बोलू नका किंवा विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. मीटिंगमध्ये तुमची पाळी असेल तेव्हाच तुमची मतं द्या.
इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, मगच काहीतरी बोला.
बोलताना अनावश्यकपणे हात हलवू नका, डोळे फिरवू नका किंवा इतरांना स्पर्श करू नका किंवा मारू नका (ग्रूमिंग स्किल्स).
काही खाताना बोलू नका. मीटिंग संपल्यानंतर लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.