मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

दहावी पास उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीमध्ये भरपूर जागा रिक्त

दहावी पास उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या कंपनीमध्ये भरपूर जागा रिक्त

अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 03 जुलै: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) या  भारत सरकारच्या (Government of India) कंपनीमध्ये दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या कंपनीत लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) या पदासाठी अनेक जागा रिक्त आहेत. अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.

या जागेसाठी भरती

ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice)  - एकूण जागा 121

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून दहावी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे आयटीआय पदवी असणं आवश्यक आहे.

हे वाचा - मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये सिनिअर रेसिडंट पदांसाठी जागा रिक्त

निवड प्रक्रिया

या पदांवर उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जाहीर केलेली अधिसूचना वाचू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Central government, Jobs