NEET result : मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचं ntaneet.nic.in इथे लागेल प्रवेशपरीक्षेचा निकाल

NTA NEET 2019 Result : वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल उद्या - बुधवारी - 5 जून रोजी लागणार आहे. मेडिकल एंट्रन्स टेस्टचा हा निकाल ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेबसाईटवर अधिकृतपणे पाहता येईल.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 07:52 PM IST

NEET result : मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचं ntaneet.nic.in इथे लागेल प्रवेशपरीक्षेचा निकाल

मुंबई, 4 जून : वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेचा अर्थात NEET 2019 चा Result उद्या (बुधवार, 5 जून)लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात National Testing Agency NTA ने ही प्रवेश परीक्षा घेतली होती. NTA NEET 2019 Result बुधवारी NTA च्या वेबसाईटवर पाहता येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी  ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेबसाईटवर लॉगइन करावं, असं कळवण्यात आलं आहे.

देशभरात गेल्या 5 मे रोजी NEET घेण्यात आली होती. फानी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ओडिशा आणि कर्नाटकात मात्र 20 मे रोजी NEET परीक्षा घेण्यात आली. याअगोदरच या प्रवेश परीक्षेची उत्तरं NEET Answer Key 2019 जाहीर करण्यात आली आहेत. त्यावरच्या आक्षेपांना 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता अंतिम निकाल उद्या लागणार आहे.

NEET Result 2019 कसा बघायचा?

प्रथम ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

डाउनलोड टॅबमध्ये download NEET Result 2019 जाऊन क्लिक करा.

Loading...

उघडलेल्या नव्या विंडोमध्ये आवश्यक माहिती भरा.

ही माहिती भरल्यानंतर लगेच तुमचा NTA NEET Result 2019 स्क्रीनवर झळकेल.

आरोग्यसेवा संचालनालयाने दिलेल्या सूचनेनुसार या प्रवेशपरीक्षेची मेरिट लिस्ट काढण्यात येईल. SC, ST विद्यार्थ्यांना किमान 40 गुण अनिवार्य आहेत. इतरांसाठी किमान गुण 50 पर्सेंटाइल असणं बंधनकारक आहे.


VIDEO : युतीत जागावाटपाच्या वादावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...