Jobs: हातात पदवी नसेल तरी मिळेल नोकरी; हे पर्याय पाहा

Jobs: हातात पदवी नसेल तरी मिळेल नोकरी; हे पर्याय पाहा

नोकरी हवी आहे? त्यासाठी बेसिक पदवीपर्यंतचं शिक्षण लागतंच. पण अशीही काही क्षेत्र आहेत जिथे नोकरी करण्यासाठी तुम्हाला डिग्रीची गरज नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: नोकरी हवी आहे? त्यासाठी बेसिक पदवीपर्यंतचं शिक्षण लागतंच. कोणती डिग्री हवी ही चिंता सतावतीये? पण जर कोणी तुम्हाला असं सांगितलं की काही क्षेत्रातल्या नोकऱ्या अशाही आहेत ज्या डिग्रीशिवाय तुम्ही मिळवू शकता तर? विश्वास नाही बसत ना, पण हे सत्य आहे. हो, पण पदवी नसली, तरी त्या क्षेत्राबद्दलची बेसिक माहिती, ज्ञान आणि किमान कौशल्य हाती हवं.

तुमच्याकडे डिग्री आली की नोकरी आली आणि नोकरी आली की छोकरी आली हे जणू एक ठरलेलं समीकरण आहे. किमान पदवीधर ही अट बहुतेक सर्व नोकऱ्यांमध्ये असते. मग ती नोकरी सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्रातली. पोलीस भरती, बँक, सरकारी कार्यालयं या ठिकाणी तर आवर्जून तुमची डिग्री बघितली जाते. आणि त्यावरूनच तुम्हाला पुढे नोकरीची संधी मिळते. कारण तुमची डिग्री हे तुमच्यामध्ये त्या विषयासोबतच सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं एक माध्यम मानलं जातं.

पण काही क्षेत्रातल्या नोकऱ्या अशासुद्धा आहेत ज्या तुम्ही डिग्रीने नाही तर तुमच्या कलागुणांच्या आधारावर मिळवू शकता. आजच्या युगात कंपनीसुद्धा उमेदवाराच्या शैक्षणिक गुणांपेक्षा त्याचं त्या क्षेत्रातलं ज्ञान, कौशल्य, आवड आणि अनुभव पाहून त्याला नोकरीची संधी देतात. त्यासाठी तुमचं तुमच्या आवडत्या कलेवर किंवा विषयावर प्रभुत्व असण खूप गरजेचं आहे.

या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी तुम्हाला डिग्रीची गरज नाही, तरीही मोठ्या कंपन्या तुम्हाला नोकरी देऊ शकतात. पण त्यातील शिक्षण तुमच्याकडे असेल तर तुम्ही अधिक प्रगती करू शकता. कोणत्या आहेत या नोकऱ्या चला जाणून घेऊ या:

1) Photographer: ( फोटोग्राफर )

आजकाल, डिजिटल फोटोग्राफीला प्रचंड मोठी मागणी आहे. फोटोग्राफी हा फक्त काही लोकांचा छंद आहे आणि ते त्यांच्या या छंदाला व्यवसायात बदलून  शकतात चांगले पैसे मिळवू शकतात.

खूप साऱ्या फोटो स्टुडीओ आणि मीडिया हाउसेसला चांगले फोटोग्राफर हवे असतात. आणि जर तुमच्यात फोटोग्राफीचं कौशल्य असेल आणि तुम्ही आकर्षक छायाचित्रे कॅप्चर करू शकत असाल तर कोणत्याही डिग्रीशिवाय तुम्ही ती नोकरी सहज मिळवू शकता.

2) You Tuber ( युट्युबऱ )

युट्युब चॅनेल काढून काही जणच प्रसिद्धी मिळवतात आणि फक्त एक- दोन जणांचा मिळूनच युट्युब चॅनेल असू शकतो हा खूप लोकांना गैरसमज आहे. जर तुम्हाला व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती आहे किंवा तुम्ही उत्तम प्रकारे कोणत्याही विषयावर संशोधन करून व्हिडीओ बनवण्यासाठी माहिती गोळा करू शकता तर असे देखील जॉब्स तुम्हाला मिळू शकतात.

बरेच नवीन मीडिया हाउस, न्यूज चॅनेल, नवीन बिझनेस हाऊसेस अशा व्यक्तींच्या शोधात असतात.

3) Content Writer:

तुमचं फेसबुक उघडून पहा, तुम्हाला ‘ या या विषयावर कंटेंट लिहून हवा ‘ अशी एखादी तरी पोस्ट हमखास दिसते. त्याचसोबत कित्येक वेळा तुम्हाला फक्त ‘कंटेंट रायटर’ साठी जाहिरात दिसते. यासाठी तुमचं फक्त भाषेवरचं प्रभुत्व आणि त्या विषयाबद्दलची तुम्हाला असलेली माहिती ही सुद्धा कित्येकदा तुम्हाला ती नोकरी मिळवून द्यायला पुरेशी ठरते. पण लिखाणावर प्रेम हवं आणि क्लाएंटला हवं त्या पद्धतीने बिनचूक भाषेत लिहिता यायला हवं.

4) Website Developer:

आजकाल इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे प्रत्येकजण आपल्या नवीन बिझनेससाठी वेबसाईटची मदत घेत आहे. वेबसाईट डेव्हलपमेंटचे कोर्स हे आजकाल युट्युबवर सुद्धा उपलब्ध आहेत. यावरून तुम्ही या गोष्टी शिकू शकता आणि तुम्ही स्वतः डिजाईन केलेल्या 4 – 5 वेबसाईटचे नमुने दाखवून ही नोकरी सहज मिळवू शकता.

अवश्य वाचा -     कोरोनानं देशापुढे ठेवलेलं सर्वांत मोठं आव्हान; 26 कोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान कसं भरून काढणार?

5) Social media manager:

सुरवातीच्या काळात सोशल मीडिया फक्त करमणुकीचे साधन आहे आणि त्यावर फक्त वेळ वाया जातो अशीच लोकांची धारणा होती. आता मात्र सोशल मीडिया तुम्हाला नोकरीची उत्तम संधी उपलब्ध करून देऊ शकतो.

जर तुमच्यात ग्राफिक्स, लिखाण, व्हिडीओ मेकींग, फोटोग्राफी यासारखं कुठलही टॅलेंट असेल तर तुमच्यासाठी कित्येक कंपन्यांच्या सोशल मीडिया विंगचे दरवाजे उघडे होऊ शकतात.

6) Event Management:

भारत हा उत्सवाचा देश आहे. इथे संपूर्ण वर्षभर लग्न, वाढदिवस, पार्टी, समारंभ आणि बरेच कार्यक्रम चालूच असतात. पण इथे कोणालाच स्वतः उभं राहून ही सगळी तयारी करून घ्यायला वेळ नसतो आणि अशा वेळी हे सगळं काम ईव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे सोपवली जातात.

तुमच्याकडे जर दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याची, व्यवस्थीत राहण्याची आणि बोलण्याची आणि सजावटीची आवड असेल तर ही नोकरी तुमची होऊ शकते.

7) Translation:

तुमचं जर इंग्रजीवर प्रभुत्व असेल आणि सोबतच अजून 2 – 3 भाषा तुम्हाला येत असतील तर तुम्ही या नोकरी बाबत विचार करू शकता.

इंग्रजी जरी व्यवसायाची प्रमुख भाषा असली तरी प्रत्येकाला कंटेंट हा त्याच्या मातृभाषेतच हवा असतो. आणि जर तुम्हाला भाषांतराच काम जमत असेल तर तुम्ही यासाठी आवेदन करू शकता.

8) Body Trainer or Jim Trainer:

काही लोकांना जीमला जाणं आणि बॉडी बनवण खूप आवडत. त्यासाठी ते तासनतास जीम मध्ये घाम गाळतात. यामुळे बॉडी बिल्डींगबाबत आणि फिटनेस बाबत त्यांना चांगलीच माहिती असते.

पण काही लोकांना जीमला जाणं जमत नाही मग अशे लोक घरातच जीम उघडून पर्सनल ट्रेनर ठेवतात. आणि त्यांना चांगला पगार देखील देतात. त्यामुळे जर तुम्हाला बॉडी बिल्डींग आणि फिटनेस मध्ये आवड असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता.

9) Painter (चित्रकार) :

चित्रकला म्हणजे फक्त शाळेतली चित्र किंवा प्रदर्शनातली चित्र एवढचं काय ते आपल्याला माहिती. पण चित्रकलेला नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत.

कित्येक चित्रकार वर्तमानपत्रात कार्टूनिस्ट म्हणून काम करत असतात. तसेच कित्येक कंपन्यांना सोशल मीडियावर सतत दिसत राहण्यासाठी छोट्या चित्रकथेची आवश्यकता असते. तुमच्या अंगात अशी कला असेल तर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या कंपनीसोबत जोडले जाऊ शकता.

10) Makeup Artist (मेकअप आर्टिस्ट) :

सध्या भारतीय चित्रपट सृष्टीत मोठया बदलातून जात आहे. नवनवीन प्रयोगांमुळे कलाकारांची मागणी वाढली आहे आणि त्याचसोबत त्यांना मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्टची सुद्धा. तुमच्या अंगात जर ही कला असेल तर कुठल्याही डिग्रीशिवाय तुम्हाला ही नोकरी सहज मिळू शकेल.

Published by: Aditya Thube
First published: February 20, 2021, 9:11 AM IST

ताज्या बातम्या