मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता 'हे' प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही 11वीत मिळणार प्रवेश

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता 'हे' प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही 11वीत मिळणार प्रवेश

Representative Image

Representative Image

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं (School Education Department Maharashtra) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 31 ऑगस्ट: राज्यात सध्या कॉलेज आणि जुनिअर कॉलेज प्रवेशाचे (11th admissions Maharashtra) वारे वाहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता अकरावीची प्रवेश प्रक्रियाही (11th Admission Process) सुरु झाली आहे. अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादीही (11th Merit list) जाहीर करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व  प्रकारची कागदपत्रं (Important Documents for 11th admissions) जमा करावी लागत आहेत. मात्र यातील काही कागदपत्रं नसतील तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास अडचणी (trouble in Admissions) येत आहेत. हीच अडचण लक्षात घेऊन राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं (School Education Department Maharashtra) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रवेशाच्या वेळी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र (Caste Certificate) नाही अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सरकारकडून 30 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

हे वाचा - Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका

विद्यार्थ्यांचं स्वतःचं जात प्रमाणपत्र (Caste Certificate in Admissions) येतपर्यंत विद्यार्थी वडिलांचं जात प्रमाणपत्र देऊन प्रवेश घेऊ शकणार आहेत.

विद्यार्थ्यांना वडिलांच्या प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. एकदा विद्यार्थ्यांच्या नावाचं जात प्रमाणपत्र आलं की विद्यार्थ्यांना ते कॉलेजमध्ये सबमिट करावं लागणार आहे. काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या. कोलेक ढे प्रवेश दिला जाऊ शकत नव्हता म्हणून हा मोठा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

First published:

Tags: Government