Home /News /career /

क्या बात है! आता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी PhD ची अट नाही; UGC चा महत्त्वाचा निर्णय

क्या बात है! आता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी PhD ची अट नाही; UGC चा महत्त्वाचा निर्णय

2023 पर्यंत UGC NET स्कोअरच्या आधारावर नोकरभरती सुरू राहणार आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: केंद्र सरकारनं (Central Government) UGCच्या नियमांमध्ये सुधारणा केली असून सहाय्यक प्राध्यापकांच्या (Assistant Professor eligibility) पदावर नियुक्त करण्यासाठी किमान पात्रता पीएचडी (PhD not compulsory for Assistant Professor posts) आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी पीएचडीची किमान पात्रता बनवणारे UGCचे 2018 चे नियम (UGC 2018 Rules) 2021 पासून लागू होणार होते. मात्र   कोविड -19 महामारीमुळे हे नियम आता पुढे ढकलण्यात आले आहेत. यासंबंधीचा कालावधी जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे . 2023 पर्यंत UGC NET स्कोअरच्या आधारावर नोकरभरती सुरू राहणार आहे. UGC च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त प्राध्यापकांची पदं नेहमीपेक्षा वेगानं भरली जाण्याची अपेक्षा आहे. UGCनं कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी अनिवार्य पात्रता म्हणून PhD अर्ज करण्याची तारीख 1 जुलै 2021 पासून 1 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा- IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देण्याची गरज नाही? असा घ्या प्रवेश आता लागू असलेल्या निकषांनुसार,  जे उमेदवार NET, SET, SLET सह शिक्षक पात्रता परीक्षांसाठी पात्र ठरतात ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसंच ज्या उमेदवारांनी यूजीसी नियमांनुसार पीएचडी पदवी घेतली आहे अशा उमेदवारांना NET, SET, SLET च्या किमान पात्रतेच्या अटींमधून सूट दिली जाणार आहे. "01.07.2023 पासून विद्यापीठांच्या विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर थेट भरतीसाठी पीएचडी पदवी अनिवार्य पात्रता असेल. ही सुधारणा यूजीसी दुरुस्ती नियमन, 2021 म्हणून ओळखली जाईल", असं UGC च्या अधिकृत निवेदनात म्हंटलं आहे. त्यामुळे आता  2023 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी PhD ची गरज नसणार आहे. मात्र तोपर्यंत UGC NET स्कोअरच्या आधारावर असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी नोकरभरती सुरू राहणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Education

    पुढील बातम्या