मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! CAT परीक्षा न देताही मिळू शकतो IIM मध्ये प्रवेश; अशा पद्धतीनं घेता येईल शिक्षण

क्या बात है! CAT परीक्षा न देताही मिळू शकतो IIM मध्ये प्रवेश; अशा पद्धतीनं घेता येईल शिक्षण

परीक्षा न देताही तुम्ही IIM मध्ये प्रवेश (MBA Admission without CAT) मिळवू शकता.

परीक्षा न देताही तुम्ही IIM मध्ये प्रवेश (MBA Admission without CAT) मिळवू शकता.

परीक्षा न देताही तुम्ही IIM मध्ये प्रवेश (MBA Admission without CAT) मिळवू शकता.

  • Published by:  Atharva Mahankal
नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: भारतातील चांगल्या कॉलेजेसमध्ये MBA करणं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. अनेक विद्यार्थी MBA करण्यासाठी (How to Take admission in MBA) IIM म्हणजेच इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंटची (MBA In IIM) निवड करतात. मात्र इथे प्रवेश मिळणं काही सोपं नाही. संपूर्ण देशातील MBA कॉलेजेसमध्ये (Top MBA college in India) प्रवेश मिळवण्यासाठी CAT नावाची परीक्षा (Entrance for Admission in MBA) द्यावी लागते. या परीक्षेच्या मार्कांवर IIM मध्ये प्रवेश मिळणार की नाही हे ठरतं. या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी अक्षरशः दिवसरात्र एक करतात. पण  परीक्षा न देताही तुम्ही IIM मध्ये प्रवेश (MBA Admission without CAT) मिळवू शकता. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो हे खरं आहे. पण हा प्रवेश कसा मिळवता (How to take admission in MBA without CAT) येईल याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. खरं म्हणजे केवळ CAT च्या गुणांवर MBA मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. या प्रवेश परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना Aptitude टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या सर्व प्रक्रियेतून तुमची निवड होइलच असं नाही. म्हणूनच दुसरा पर्याय शोधणं आवश्यक आहे. हे वाचा - Vodafone Recruitment: Vodafone India मध्ये 'या' पदांसाठी इंजिनीअर फ्रेशर्सना मिळणार सर्वात मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स इतर प्रवेश परीक्षा IIM मध्ये प्रवेश घेण्यासाठी CAT परीक्षा हा एकमेव मार्ग नाही. GIMT आणि GIPMT परीक्षा आहेत ज्या तुम्हाला IIM च्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास मदत करतील आणि 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या परीक्षा देऊ शकता. IIM चा भाग बनू इच्छिणारे विद्यार्थी पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (GMAT) मध्येही उपस्थित राहू शकतात. जीमॅट स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना  200 हून अधिक प्रोग्राम्समध्ये आणि 140 बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकतो.  IIM अहमदाबाद, IIM बंगलोर, कोलकाता, इंदूर, कोझीकोड, लखनौ यासह इतर संस्थांमध्ये स्कोअरच्या आधारे विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. बारावीनंतर थेट प्रवेश आयआयएममध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. टॉप इन्स्टिट्यूट्स इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (IPM) ऑफर करतात जे कोर्स इयत्ता 12 वी नंतर करता येतात. या मार्गानं जाणारे विद्यार्थी पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्सेसचा अभ्यास करू शकतात आणि दोन डिग्री मिळवू शकतात.  IIM जम्मू, IIM बोधगया, IIM रोहतक आणि IIM इंदौर इथे अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित संयुक्त चाचणी कार्यक्रम (JIPMAT) ही परीक्षा देणं आवश्यक असतं. हे वाचा - IIM Recruitment: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी ऑनलाईन कोर्सेस IIM विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी अनेक ऑनलाइन, प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम देते. कोर्सरा, ईडीएक्स सारख्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला भेट देऊन तसेच आयआयएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. असे अभ्यासक्रम वर्षभरात दिले जातात.
First published:

Tags: Career opportunities, Entrance exam

पुढील बातम्या