Home /News /career /

काय सांगता! IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देण्याची गरज नाही? अशा पद्धतीनं मिळू शकतो प्रवेश

काय सांगता! IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देण्याची गरज नाही? अशा पद्धतीनं मिळू शकतो प्रवेश

असे अनेक मार्ग आहेत आणि परीक्षा (Exam important for IIT admission) आहेत ज्यामध्ये चांगले मार्क्स मिळवून तुम्ही IIT ला प्रवेश मिळवू शकता.

    मुंबई,11 ऑक्टोबर: दहावीनंतर अकरावी आणि बारावीची परीक्षा देऊन इंजिनिअरिंगचं शिक्षण (Education in engineering) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना JEE ही परीक्षा (Importance of JEE exam) द्यावी लागते. आधी JEE mains आणि त्यानंतर JEE Advance ही परीक्षा द्यावी लागते. या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवूनच देशातील टॉप इंजिनिअरिंग IIT ला प्रवेश (How to get admission in IIT without giving JEE) मिळू शकतो. मात्र IIT ला प्रवेश मिळवण्यासाठी हाच एक मार्ग नाही. असे अनेक मार्ग आहेत आणि परीक्षा (Exam important for IIT admission) आहेत ज्यामध्ये चांगले मार्क्स मिळवून तुम्ही IIT ला प्रवेश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. Graduate Aptitude Test of Engineering (GATE) ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC), बेंगळुरू आणि मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी या सात IIT द्वारे संयुक्तपणे घेतली जाते. आयआयटीमधून मास्टर्स किंवा पीएचडी करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी गेट परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा उत्तीर्ण करून, उमेदवार एमटेक, इंटिग्रेटेड एमटेक-पीएचडी आणि इंजिनिअरिंग आणि संबंधित विषयातील पीएचडीसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हे वाचा- क्या बात है! CAT परीक्षा न देताही मिळू शकतो IIM मध्ये प्रवेश; अशा पद्धतीनं घेता येईल शिक्षण Common Admission Test (CAT) ही ऑनलाइन परीक्षा मुळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) त्यांच्या व्यवसाय प्रशासनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. पण आयआयटी देखील कॅट स्कोअरवर आधारित उमेदवारांना त्यांच्या व्यवस्थापन कार्यक्रमांसाठी प्रवेश देतात. चाचणीमध्ये तीन विभाग असतात - Verbal Ability आणि Reading Comprehension (VARC), डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रीझनिंग (DILR) आणि क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी (QA). Joint Admission Test (JAM) ही परीक्षा एमआयएससी, पीएचडी आणि इतर पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी आयआयटीमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितीय सांख्यिकी, भूविज्ञान, जैविक विज्ञान, जैवतंत्रज्ञान या सात विषयांमध्ये घेतली जाते. जे उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करतात ते भारतीय विज्ञान संस्था (IISc, बंगलोर), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISERs), राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (NISER, भुवनेश्वर), राष्ट्रीय संस्था येथे MSc अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र असतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, IIT

    पुढील बातम्या