मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! आता परदेशातही सुरु होणार IIT Campus; नव्या शैक्षणिक धोरणानुसार मोठा निर्णय

क्या बात है! आता परदेशातही सुरु होणार IIT Campus; नव्या शैक्षणिक धोरणानुसार मोठा निर्णय

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या (National Education Policy) शिफारशीनुसार आता आयआयटीचं शिक्षण भारताबाहेरही घेणं शक्य होईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 सप्टेंबर:  भारतात तंत्रज्ञान व इंजिनीअरिंग शिक्षणासाठी आयआयटी (Indian Institute Of Technology) या सर्वांत उच्च व नामांकित संस्था आहेत. या संस्थांतून शिक्षण घेण्यासाठी देशातले लाखो विद्यार्थी धडपडत असतात. देशातल्याच नाही, तर परदेशातल्या विद्यार्थ्यांनाही भारतातल्या आयआयटीजबाबत अप्रूप आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या (National Education Policy) शिफारशीनुसार आता आयआयटीचं शिक्षण भारताबाहेरही घेणं शक्य होईल. कारण संयुक्त अरब अमिराती व इतर काही देशांमध्ये आयआयटी संस्था सुरू करण्याविषयीच्या घडामोडींना आता वेग आला आहे. 'लाइव्हमिंट'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

भारताबाहेर सुरू होणाऱ्या या आयआयटीच्या (Offshore IIT) संस्थांना “इंडियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” असं नाव असेल. तसंच भारतीय आयआयटीजमधले काही शिक्षकच त्या संस्थांमध्ये शिकवायला असतील, असं पीटीआयनं म्हटलं आहे. मूळ आयआयटी या नावात ‘इंटरनॅशनल’ हा शब्द घातल्यानं कोणाचा गोंधळ होणार नाही. त्याच वेळी ते आयआयटी नावाशी साधर्म्य असणारंही असेल. परदेशातली आयआयटी ही स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली संस्था असली पाहिजे; मात्र भारतातील आयआयटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ती चालावी असं त्यामागचं कारण असल्याचं सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

ऑन रोल आणि ऑफ रोल जॉब म्हणजे नक्की काय? कंपनीत तुम्ही कोणत्या जॉबवर आहात? असा ओळखा फरक

भारताबाहेर आयआयटी स्थापन करण्याबाबत आधी 17 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. आयआयटी कौन्सिलचे अध्यक्ष के. राधाकृष्णन हे त्याचे अध्यक्ष होते. जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक गोविंदन रंगराजन, तसंच भारतातल्या विविध आयआयटीजचे संचालक यांचा या समितीत समावेश होता.

रिपोर्ट्सनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया आणि इजिप्त हे देश आयआयटीच्या शाखा उघडण्यासाठी उत्सुक आहेत. त्यानुसार आयआयटी दिल्लीचा यूएईमध्ये, तर आयआयटी मद्रासचा श्रीलंका, नेपाळ आणि टांझानिया या देशांत शाखा उघडण्याचा विचार आहे.

भारताबाहेरची आयआयटी कशी असेल?

समितीच्या शिफारशींनुसार, भारताबाहेरच्या आयआयटीची स्थापना प्रामुख्यानं आयआयटी व एनआयटी (National Institute Of Technology) किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) या संस्थांप्रमाणेच व्हावी. याचाच अर्थ सध्याच्या आयआयटी कायद्यानुसार, भारताबाहेर आयआयटी स्थापन करण्याला मान्यता नाही. परदेशात संस्था स्थापन करण्यासाठी चार मॉडेल्स या समितीनं सुचवली आहेत.

- मॉडेल A – ठराविक आयआयटीचा परदेशातला कॅम्पस

- मॉडेल B – आयआयटी संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांनी सुरू केलेला नवीन कॅम्पस

- मॉडेल C - एक किंवा त्यापेक्षा अधिक आयआयटी संस्था व परदेशातलं नामांकित विद्यापीठ यांच्या सहकार्यानं स्थापन केलेला आयआयटी कॅम्पस

- मॉडेल D – परदेशात सुरू करण्यात येणाऱ्या स्वतंत्र संस्थांची साखळी

परदेशातल्या आयआयटीतलं शिक्षण

भारताबाहेरील सर्व आयआयटी कॅम्ससमध्ये इंग्रजी हीच शिक्षणासाठीची भाषा असेल. तिथे सेमिस्टर पद्धती अवलंबण्यात यावी; मात्र सेमिस्टरच्या सुरुवातीच्या व संपण्याच्या तारखा त्या देशाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार असाव्यात. विद्यार्थ्यांना यात बीटेक (B.Tech.), एमटेक (M.Tech.) आणि पीएचडी (PhD) करता येईल. या व्यतिरिक्त काही विशेष कोर्सेसही तेथे असतील.

- कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

- डेटा सायन्स

- आर्टिफिशियल इंटेलिजन्स

- मशीन लर्निंग

- रोबॉटिक्स

- इलेक्ट्रॉनिक्स

- मायनिंग किंवा पेट्रोलियम आणि एनर्जी

Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; हेवा वाटेल असा YouTuber

परदेशातल्या आयआयटीमधील विद्यार्थी संख्या

आर्थिकदृष्ट्या परवडेल अशीच विद्यार्थीसंख्या परदेशातल्या आयआयटीमध्ये असावी. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य संस्थेला असावं. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनाही यात स्थान मिळावं; मात्र ही संख्या 20 टक्क्यांपेक्षा कमी असावी असं समितीनं सुचवलेलं आहे. बीटेकसाठी प्रति वर्षी 30 ते 40 विद्यार्थी, पदव्युत्तर शिक्षणासाठी 15 ते 20 विद्यार्थी आणि पीएचडीसाठी काही विद्यार्थी अशी विद्यार्थी संख्या असावी अशी शिफारस समितीनं केली आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert