चंद्रपुर, 16 सप्टेंबर : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला हे काही वेगळं सांगायला नको. त्यात शैक्षणिक संस्था सुरक्षेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. शहरांमध्ये किंवा सुस्थितीत असलेल्या कुटुंबांतील मुलांना ऑनलाइन वर्ग घेणं शक्य आहे. मात्र गावात जिथे पुरेशी वीज उपलब्ध नाही, तेथे ऑनलाइन क्लासेस कसे घेणार. त्यात कोरोना धोकादायक असला तरी मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये ही प्रत्येकाचीच इच्छा आहेत.
अद्यापही राज्यात कोरोनावर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही. यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. या शिक्षिकेने सार्वजनिक ठिकाण, रस्त्यांवर गणितं सोडवली आहे. त्यामुळे मुलं खेळत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर गणिताचे धडे दिसत राहतील.
हे ही वाचा-ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?
चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी सांगितले की, जर 'मिशन मॅथमॅक्टिस' यशस्वी झाले तर दुसऱ्या विषयांना घेऊनही प्रयोग केला जाईल. ते म्हणाले, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरात अभ्यास सुरू ठेवावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी ग्रामीण भागात अभ्यासाचं वातावरण तयार केलं जात आहे. खेळत खेळत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हा 'मिशन मॅथमॅक्टिस' सुरू करण्यामागचा हेतू आहे.
Teachers In Maharashtra's Solapur Paint Walls With Graffiti To Teach Students With No Internet. Brilliant! pic.twitter.com/C7eEriIxu6
— Ashok Patiyal (@patiyalashok) September 5, 2020
याशिवाय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अभिकाऱ्यांनी पोम्बरना, बल्लारपूर, नगभीड आणि बम्हपुरी तहसील गावात मुख्य चौकात भितींवर पहिली ते पाचवीपर्यंतच्या गणित विषयांची प्रकरणं ऱेखाटली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्डिले यांनी सांगितले की, मुलांना अशा प्रकारचे शिक्षण आवडत आहे. ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असताना गणित शिकत आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी मुलांमध्ये अभ्यास, गणिताविषयी आवड कायम राहावी यासाठी या अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ते म्हणाले की घोसगी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय वाकुलकर आता इंजिनीअर आहे. त्याने पहिल्यांदा आपल्या गावात मिशन मॅथेमॅटिक्स सुरू केलं होतं. ज्याच्या माध्यमातून मुलं गणित विषयातील कठीण समीकरणंही सहज शिकू शकत होते.