• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे विविध जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे विविध जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

 • Share this:
  यवतमाळ, 14 जुलै:  राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (NHM Yavatmal Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक, कनिष्ठ अभियंता, मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक नर्स, समाजसेवक, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी ही भरती असणार आहे. एकूण 11 जागांसाठी ही भरती होणार आहे. वैद्यकीय क्षेत्राशी (Medical Field Jobs) निगडित उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) सांख्यिकीय अन्वेषक (Statistical Investigator) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) मानसशास्त्रज्ञ (Psychologist) मनोचिकित्सक नर्स (Psychiatric Nurse) समाजसेवक (Social Worker) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) फिजिओथेरपिस्ट  (Physiotherapist) शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदाशी संबंधित विषयांमध्ये पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. हे वाचा - घटस्फोटानंतर खचली पण हार नाही मानली; आता घरात बसून कमावते महिन्याला 41 लाख इतका मिळेल पगार    वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- प्रतिमहिना सांख्यिकीय अन्वेषक (Statistical Investigator) - 18,000/- प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 25,000/- प्रतिमहिना मानसशास्त्रज्ञ (Psychologist) - 35,000 - 75,000/-  प्रतिमहिना मनोचिकित्सक नर्स (Psychiatric Nurse) - 25,000/- प्रतिमहिना समाजसेवक (Social Worker) - 28,000/- प्रतिमहिना ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - 25,000/- प्रतिमहिना ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - 20,000/- प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट  (Physiotherapist)  - 20,000/- प्रतिमहिना अर्ज पाठ्वणायचा पत्ता जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  22 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: