News18- Byju's Young Genius: 'Wonder Kid of India' एथलिट पूजा विश्रोई; लहान वयात मोठी कामगिरी

News18- Byju's Young Genius: 'Wonder Kid of India' एथलिट पूजा विश्रोई; लहान वयात मोठी कामगिरी

केवळ नऊ वर्षांची असताना आशियातली सर्वांत छोटी सिक्स पॅक अॅब्ज असलेली व्यक्ती ठरण्याचा मान तिने मिळवला आहे.

  • Share this:

न्यूज 18-बायजूज यंग जीनियस : क्रीडाजगतातले अनेक हिरे राजस्थानने देशाला दिले आहेत. उत्साह आणि गुणवत्तेने परिपूर्ण असलेल्या खेळाडूंची मोठी परंपरा राजस्थानला (Rajasthan) आहे. या परंपरेत आता आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे, ते म्हणजे अॅथलीट पूजा विश्नोई (Pooja Vishnoi) हिचं. केवळ नऊ वर्षांची असताना आशियातली सर्वांत छोटी सिक्स पॅक अॅब्ज असलेली व्यक्ती ठरण्याचा मान तिने मिळवला आहे.

विराट कोहली फाउंडेशन (Virat Kohli Foundation) पूजाला मदत करत आहे. तसंच बिग बी अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) तिचे फॅन आहेत. अलीकडेच पूजाच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अशा प्रकारे, ती केवळ नऊ वर्षांची असली, तर बऱ्याच महनीय व्यक्ती तिच्या फॅन्स आहेत. तिच्या गुणांमुळे, कर्तृत्वामुळे सोशल मीडियावरही तिचं फॅन फॉलोइंग मोठं आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातल्या जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यातलं गुढा विश्नोइयान हे पूजाचं गाव. जोधपूरपासून ते अवघं 30 किलोमीटरवर आहे. पूजाला केवळ जिंकणंच माहिती आहे. ती मनात जे ठरवते, ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण तिचा निश्चयच इतका तगडा असतो, की यश तिच्या पायाशी लोळण घेतं. तिचा उत्साह पाहून अडचणी तिच्यासमोर गुडघे टेकतात. ही मुलगी थांबत नाही की कुणापुढे झुकतही नाही. सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून कठीण काळालाही आव्हान द्यायला ती मागेपुढे पाहत नाही.

हे ही वाचा-BYJU'S Young Genius च्या पहिल्या भागात सादर होणार दोन अद्भुत आविष्कार

वंडर किड ऑफ इंडिया (Wonder Kid of India) या उपाधीने प्रसिद्ध होत चाललेली पूजा, आपली आई निमादेवी आणि छोटा भाऊ कुलदीप यांच्यासह मामा श्रवण बूढिया यांच्याकडे राहते. श्रवण बूढिया हेच तिचे प्रशिक्षक आहेत. तीन किलोमीटरची शर्यत 12 मिनिटं 50 सेकंदांत पूर्ण करण्याचा विक्रम पूजाने या वयातच केला आहे. 10 किलोमीटरची शर्यत तिने 48 मिनिटांत पूर्ण केली आहे. तिच्या अशा कामगिरीमुळे देश-विदेशातले अनेक पुरस्कार तिला मिळू लागले आहेत. अर्थात, पुरस्कार मिळवणं हे तिचं उद्दिष्ट नाही. क्रीडाविश्वात काही तरी वेगळं आणि खूप मोठं काही तरी करण्याची मनीषा तिने बाळगली आहे.

सूर्याच्या पहिला किरण पृथ्वीवर पोहोचेपर्यंत पूजा व्यायामासाठी सज्ज झालेली असते. सूर्य थोडा वर येईपर्यंत पूजाचं शरीर व्यायामामुळे निघालेल्या घामामुळे निथळत असतं. थंडी, ऊन, वारा, पाऊस या कशामुळेही तिच्या दिनक्रमात बदल घडत नाही. जणू काही ती थकव्यालाच नवी ऊर्जा देत असावी. ती कसून करत असलेल्या या प्रयत्नांमुळेच अडचणी दूर होऊन ती यशस्वितेच्या पायऱ्या चढत चालली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 8:53 AM IST
Tags: education

ताज्या बातम्या