मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: नक्की कोण असतात Agriculture Scientist? यात कसं करावं करिअर? इथे मिळेल माहिती

Career Tips: नक्की कोण असतात Agriculture Scientist? यात कसं करावं करिअर? इथे मिळेल माहिती

आज आम्ही तुम्हाला Agriculture Scientist कसं होता येईल आणि पात्रता काय याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर आग जाणून घेउया.

आज आम्ही तुम्हाला Agriculture Scientist कसं होता येईल आणि पात्रता काय याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर आग जाणून घेउया.

आज आम्ही तुम्हाला Agriculture Scientist कसं होता येईल आणि पात्रता काय याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर आग जाणून घेउया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 डिसेंबर: आपला देश हा कृषी संपन्न देश आहे. मात्र आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. जर तुम्हालाही कृषी क्षेत्रात प्रचंड आवड असेल तर तुम्ही शेतकऱ्यांची मदत करू शकता. कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी Agriculture Scientist ची प्रचंड गरज असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Agriculture Scientist कसं होता येईल आणि पात्रता काय याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर आग जाणून घेउया.

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

कृषी विज्ञान म्हणजे नक्की काय?

कृषी विज्ञान ही विज्ञानाची एक शाखा आहे जी शेतीशी संबंधित शेती आणि उद्योगांची उत्पादकता सुधारण्यासाठी वनस्पती, प्राणी यांचा अभ्यास आणि संशोधन करते. यामध्ये संशोधन आणि विकास जसे की फलोत्पादन, वनस्पती विज्ञान, सिंचन, कीटक आणि प्राणी यांचे परिणाम कमी करणे, अन्न उत्पादन, अन्न संरक्षण आणि प्रतिकूल पर्यावरणीय प्रभाव कमी करणे यासारख्या उत्पादन तंत्रांचा समावेश आहे. आता स्मार्ट फार्मिंगची वेळ आली आहे ज्यात कृषी उत्पादनातील नवीनतम दळणवळण तंत्रज्ञान आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

DRDO Recruitment: 10वी असो वा ग्रॅज्युएट्स सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी सोडू नका; अर्जाला अवघे काही दिवस

Agriculture Scientist होण्यासाठी शैक्षणिक पात्रता

षी शास्त्रज्ञ होण्यासाठी कृषी क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे लागते. यूजी आणि पीजी प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कृषी प्रवेश परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा ही ICAR आहे आणि अनेक राज्यस्तरीय परीक्षा आहेत ज्यात तुम्ही बसू शकता. त्यानंतर 4 वर्षांच्या कृषी अभ्यासक्रमासाठी, तुम्हाला 12वीची परीक्षा किमान 50% (SC/ST विद्यार्थ्यांसाठी 40%) उत्तीर्ण करावी लागेल. तुम्ही येथे दोन प्रवाहांपैकी एक निवडू शकता. A प्रवाह (कृषी, जीवशास्त्र) साठी कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, अन्न विज्ञान, कृषी विपणन, कृषी आणि वनीकरण हे उपलब्ध अभ्यासक्रम आहेत. तर B प्रवाह (गणित) साठी कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, वनीकरण, अन्न तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान उपलब्ध अभ्यासक्रम आहेत.

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

किती मिळतो पगार

कृषी शास्त्रज्ञाचा मासिक सरासरी पगार 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असतो, जो अनुभवानुसार वाढतो. तसंच यात स्वतःचा कन्सल्टन्सीसारखा व्यवसायही सुरु करता येऊ शकतो.

First published:

Tags: Agriculture, Career, Career opportunities, Job