Job Recritment- अकाऊंट आणि टायपिंग जमतं तर इथे मिळेल सरकारी नोकरी, पगार ८० हजारांहून अधिक

Job Recritment- अकाऊंट आणि टायपिंग जमतं तर इथे मिळेल सरकारी नोकरी, पगार ८० हजारांहून अधिक

एकुण २२८ पदांसाठी भरती होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०१८- नेहरू युवा केंद्र संघटनेने अनेक पदांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. एकुण २२८ पदांसाठी भरती होणार आहेत. नोकरीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं वय कमीत कमी १८ वर्ष ते जास्ती जास्त २५ वर्ष असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे.

असा करा अर्ज-

जिल्हा युवा समन्वयक या पदासाठी १०१ जागा आहेत. या पदासाठी १० वेगवेगळ्या स्तरांवरचे पगार ५६, १०० पासून ते १, ७७, ५०० रुपयांपर्यंत असणार आहेत.

क्लार्कसह टायपिस्ट या पदासाठी ७५ जागा असून ४ स्तरांवरचे पगार २५, ५०० पासून ८१, १०० पर्यंत असणार आहेत.

मल्टिटास्किंग स्टाफ (MTS) या पदासाठी ५२ जागा असून यात एकच स्तर आहे. यासाठी पगार १८ हजारांपासून ते ५६, ९०० पर्यंत असेल.

शैक्षणिक पात्रता-

मान्यता मिळालेल्या विद्यापिठातून किंवा कोणत्याही विषयात डिग्री असणं आवश्यक आहे.

तसेच टायपिस्ट पदासाठी मान्यता मिळालेल्या विद्यापिठातून बीकॉमची पदवी असणं आवश्यक किंवा लेखी कार्यालयात २ वर्षांचा नोकरीचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेट टायपिंग स्पीड ३० w.p.m. एवढा असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा (३१-१२-२०१८ पर्यंत)

उमेदवारांचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं तसेच २५ वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

अर्जाची फी-

सामान्य आणि ओबीसी (पुरुष) ७०० रुपये.

अर्जाची फी पुढील प्रमाणे भरा-

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेटच्या माध्यमातूनपरीक्षेची फी भरू शकता.

महत्त्वाच्या तारखा-

१५ डिसेंबर २०१८ पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे.

३१ डिसेंबर २०१८ पर्यंत उमेदवार नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकतात.

अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे.

असा करा अर्ज-

इच्छुक आणि योग्य उमेदलवारांनी १५ डिसेंबर २०१८ पासून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत http://nyks.nic.in/ या वेबसीइटवर ऑनलाइन अर्ज करा. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेवर अवलंबून असेल.

नोकरीचे ठिकाण- अखिल भारतीय

First published: December 17, 2018, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या