मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महत्त्वाची बातमी! NEET UG काउन्सिलिंग लवकरच होणार सुरु; ही महत्वाची कागदपत्रं ठेवा रेडी

महत्त्वाची बातमी! NEET UG काउन्सिलिंग लवकरच होणार सुरु; ही महत्वाची कागदपत्रं ठेवा रेडी

'या' तारखेपासून सुरु होणार दुसरा राउंड

'या' तारखेपासून सुरु होणार दुसरा राउंड

आत्तापर्यंत NEET UG काउन्सिलिंग 2022 चे वेळापत्रक जारी करण्याची तारीख आणि वेळ याबद्दल MCC द्वारे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. यंदा NEET चा कट-ऑफ गेल्या काही वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे काउन्सिलिंग नक्की कसं होणार कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. NEET UG काउन्सिलिंग 2022 वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, MCC वेबसाइट mcc.nic.in वर जाऊन ते बघता येऊ शकणार आहे. मात्र आत्तापर्यंत NEET UG काउन्सिलिंग 2022 चे वेळापत्रक जारी करण्याची तारीख आणि वेळ याबद्दल MCC द्वारे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महिन्याचा तब्बल 2,80,000 रुपये पगार; Maha Metroत 'या' उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा अप्लाय

NEET UG परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना काउन्सिलिंगसाठी उपस्थित राहावं लागतं. हे वैद्यकीय सकाउन्सिलिंग समिती आणि राज्य काउन्सिलिंग संस्था यांनी आयोजित केलं आहे. या वर्षी NEET UG साठी एकूण 18.5 लाखांहून अधिक नोंदणी करण्यात आली. NEET UG परीक्षा 17 जुलै 2022 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

NEET UG काउन्सिलिंग चं वेळापत्रक केव्हाही जाहीर होऊ शकतं. अशा परिस्थितीत काउन्सिलिंग साठी आवश्यक कागदपत्रं तयार ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. काउन्सिलिंग साठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट Jobs

ही डॉक्युमेंट्स आवश्यक

NEET रँक कार्ड

NEET प्रवेशपत्र

डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

इयत्ता 10, 12 ची मार्कशीट

Address प्रूफ

कॅरेक्टर सर्टिफिकेट

मायग्रेशन सर्टिफिकेट

वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र

पासपोर्ट साइज फोटो इ.

First published:

Tags: Entrance Exams, Job alert, Jobs Exams, Medical exams